World Cup 2019 : रो `सुपर` हीट शर्मा

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जुलै 2019

रोहित शर्माच्या खेळात सध्या कमालीचे सातत्य आहे. बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात त्याने यंदाच्या विश्वकरंडकातील चौथे शतक पूर्ण केले. 

वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : रोहित शर्माच्या खेळात सध्या कमालीचे सातत्य आहे. बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात त्याने यंदाच्या विश्वकरंडकातील चौथे शतक पूर्ण केले. 

आजच्या सामन्यात त्याने 90 चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटकारांसह आपले शतक साजरे केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील 26वे शतक आहे. 

बांगलादेशविरुद्धच्या सा्मन्यात त्याने 29 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शतक पूर्ण केले. या शतकासह त्याने कुमार संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. संगकाराने 2015च्या विश्वकरंडक स्पर्धेत चार शतके झळकाविली होती. रोहित 104 धावा करुन बाद झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma scored 4th century in world Cup 2019