INDvsSA : दिवस बदलला तरी रोहित काय थांबेना, दिडशतक पूर्ण

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर म्हणून पहिेले शतक साजरे केले. त्यानंतरही तो थांबला नाही त्याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपले दिडशतक पूर्ण केले. 

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर म्हणून पहिेले शतक साजरे केले. त्यानंतरही तो थांबला नाही त्याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपले दिडशतक पूर्ण केले. 

दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरवात झाल्यावर मयांक अगरवालनेही त्याचे शतक पूर्ण केले. त्याच्यापाठोपाठ रोहितने 224 चेंडूंत त्याचे दिडशतक पूर्ण केले. रोहितच्या तुफान खेळीकडे पाहता कसोटी क्रिकेटमधील त्याच्या पहिल्या द्विशतकाची सर्वच चाहते वाट पाहत आहेत.  

रोहित आणि मयांक यांच्या शतकामुळे भारताने 250 पार जात भक्कम धावसंख्या उभारली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma scores 150 runs in 1st test against South Africa