INDvsSA : रोहित तुला साष्टांग नमस्कार!; आजही ठोकलं शतक

Rohit sharma scores another century in 3rd test against South Africa
Rohit sharma scores another century in 3rd test against South Africa

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातही भारताचा सलामीवीर रोहित शर्माने कसोटी कारकिर्दीमधील सहावं शतक झळकाविलं आहे. 

रोहितचं हे या मालिकेतील तिसरे शतक आहे. रोहितने नेहमीप्रमाणे आक्रमक खेळ करत केवळ 131 धावांमध्ये शतक झळकाविले. त्याने या शतकात 13 चौकार आणि चार षटकार खेचले. तसेच या शतकासह रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधील 2000 धावाही पूर्ण झाल्या आहेत. 

दरम्यान भारताचे तीन फलंदाज माघारी गेल्यावर रोहित आणि रहाणे यांना चांगली फलंदाजी करत भारताला 150चा टप्पा पार करुन दिला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com