रोहित शर्माच्या एकाच फोटोमध्ये बघा 900 षटकारांची झलक

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

रोहितने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन त्याचा आणि विंडीजचा सलामीवीर आणि स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा 45 असा सेम जर्सीनंबर असलेला फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये थोडे थोडके नाही तर तब्बल 900 षटकरांची झलक होत आहे. 

गयाना : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आजपासून एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. यापूर्वी झालेल्या ट्वेंटी20 मालिकेत भारताने विंडीजला व्हाईट वॉश दिला आहे. या मालिकेत रोहित शर्माने चांगलेच चौकार-षटकार मारले होते. आता रोहित शर्माने सोशल मडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये थोडे थोडके नाही तर तब्बल 900 षटकरांची झलक होत आहे. 

रोहितने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन त्याचा आणि विंडीजचा सलामीवीर आणि स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा 45 असा सेम जर्सीनंबर असलेला फोटो शेअर केला आहे. 

तसेच आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यो दोघांनी मिळून तब्बल 900 षटकार मारले आहेत. आपली अखेरची एकदिवसीय मालिका खेळणाऱ्या गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 529 तर रोहितने 371 षटकार खेचले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक षटकार मारणारा गेल हा पहिला फलंदाज आहे तर भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा रोहित हा पहिला फलंदाज आहे.  
गेल
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma shares a photo with Chris Gayle