विराटला 'लोड' होतोय; आता ट्वेंटी20ची धूरा रोहितकडेच द्यावी : युवराज सिंग

वृत्तसंस्था
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

तिन्ही प्रकारांत नेतृत्व करण्याचा विराट कोहलीला ताण जावणत असेल तर टी20 साठी रोहित शर्माचा पर्याय आहे, असे सूचक मत माजी अष्टपैलू युवराज सिंग याने व्यक्त केले. 

नवी दिल्ली : तिन्ही प्रकारांत नेतृत्व करण्याचा विराट कोहलीला ताण जावणत असेल तर टी20 साठी रोहित शर्माचा पर्याय आहे, असे सूचक मत माजी अष्टपैलू युवराज सिंग याने व्यक्त केले. 

Breaking : इंग्लंडच्या कर्णधाराने केली क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर

झटपट क्रिकेटसाठी उपकर्णधार असलेला आणि विराटच्या अनुपस्थितीत नेतृत्व करणारा रोहित आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे. त्याने मुंबई इंडियन्सला चार वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. युवराजच्या मते वेगवेगळे कर्णधार नेमणे ही कल्पना काही वाईट ठरणार नाही. त्यामुळे जगातील सर्वोत्तम फलंदाजावरील ताण कमी होण्यास मदतच होईल.

 याविषयी तो म्हणाला की, पूर्वी कसोटी आणि वन-डे असे दोनच प्रकार होते. त्यामुळे एकच कर्णधार असणे योग्य होते. आता तीन प्रकार आहेत. अशावेळी विराटला ताण जाणवत असेल तर टी20 साठी दुसऱ्या कुणाला तरी संधी देण्याचा प्रयत्न करता येईल. रोहित हा एक फार यशस्वी कर्णधार राहिला आहे. 

चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटला; आपला ट्वेंटी20 किंग कमबॅक करतोय!

मला खरोखरच कल्पना नाही. विराट किती "लोड' पेलू शकतो हे संघव्यवस्थापनाने ठरवावे. टी20साठी दुसऱ्या कुणाला संधी द्यायची हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे. विराट जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याच्यावरील "लोड' कसा हाताळायचा हा सर्वस्वी व्यवस्थापनाचा निर्णय आहे. 
- युवराज सिंग, माजी अष्टपैलू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma Should be made captain of T20 team suggests Yuvraj Singh