Rohit Sharma Statement about Ajinkya Rahane Cheteshwar Pujara
Rohit Sharma Statement about Ajinkya Rahane Cheteshwar Pujara esakal

'मेरे रहाणे - पुजारा आएंगे' रोहित शर्माने पत्रकार परिषदेत दिले संकेत

मोहाली: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी मोहालीत सुरू होत आहे. ही कसोटी अनेक अर्थाने भारतीय क्रिकेटसाठी फार महत्वाची आहे. विराट कोहलीची ही शंभरावी तर पूर्णवेळ कॅप्टन म्हणून रोहितची ही पहिलीच कसोटी आहे. तसेच या कसोटीत भारत अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Ajinkya Rahane) यांच्याविना खेळणार आहे. या दोन अनुभवी फलंदाजांची जागा नव्या दमाचे फलंदाज घेणार आहेत. मात्र ते या दोघांची जागा घेऊ शकतील का याबाबत विचारणा झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) अजिंक्य आणि पुजाराची जागा भरून काढणे कठीण आहे असे सांगितले. (Rohit Sharma Statement about Ajinkya Rahane Cheteshwar Pujara)

Rohit Sharma Statement about Ajinkya Rahane Cheteshwar Pujara
INDvsSL Live: भारताने नाणेफेक जिंकली; फक्त दोन वेगवान गोलंदाज खेळणार

रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला की, 'अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचे योगदान शब्दात व्यक्त केले जाऊ शकत नाही. अनेक वर्ष त्यांनी कष्ट केले आहेत. त्यांनी 80 आणि 90 कसोटी खेळणे, विदेशी दौऱ्यावर कसोटीत चांगली कामगिरी करणे आणि भारताला कसोटीत अव्वल स्थानावर पोहचवण्यात या दोघांचे मोठे योगदान आहे. ते आमच्या रणनीतीचा भाग नाहीत असे नाही. हा सध्याच्या घडीचा प्रश्न आहे. या दौऱ्यासाठी त्यांचा विचार झाला नाही. भविष्यातही असेच होईल असे नाही.' रोहितने आता अजिंक्य - पुजाराची जागा कोण घेणार हे पत्रकार परिषदेत गुलदस्त्यात ठेवले.

Rohit Sharma Statement about Ajinkya Rahane Cheteshwar Pujara
'हाजमे की गोली अन् विराट कोहली' 100 व्या टेस्टसाठी सेहवागच्या हटके शुभेच्छा

रोहितने नव्या खेळाडूंसाठी कसोटी क्रिकेट (Test Cricket) आव्हानात्मक असणार आहे. मात्र त्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी पूर्ण संधी दिली जाईल असेही तो म्हणाला. रोहितने सांगितले की, 'ज्यावेळी संघात बदल होतात त्यावेळी नव्या खेळाडूंसाठी ते सोपे नसते. मात्र संघात असे खेळाडू आहेत ज्यांनी भारताकडून किंवा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मला वाटते की त्यांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे. आम्हाला भविष्याचा विचार करायचा आहे. हे खेळाडू फार काळापासून वाट पाहत होते. त्यांना आता संधी मिळाल्यावर ते चांगली कामगिरी करतील अशी आशा आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com