INDvsSA : सलामीला जम बसला की तुमचंच राज्य असतं : रोहित शर्मा

Rohit Sharma talks about his century as an opener in test against South Africa
Rohit Sharma talks about his century as an opener in test against South Africa

विशाखापट्टणम : भारताचा सलमावीर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पदार्पण करतानाच शतक झळकाविले आणि त्याचबरोबर अनेक विक्रमही केले. सलामीला गेल्यावर थोडा जम बसायला वेळ लागतो. मात्र, त्यानंतर फलंदाजाचंच राज्य असतं अशा शब्दांत त्याने त्याच्या खेळीचे वर्णन केले आहे. 

''सलामीला फलंदाजीला जाण्याचा एक फायदा असा असतो की फलंदाजी कधी येणार याची वाट बघावी लागत नाही. प्रथम फलंदाजी असो वा दुसरी तुम्हांला बस पॅड बांधून आत जायचे असते. जास्त विचार करायला वेळ मिळत नाही. आत गेल्यावर फक्त नव्या चेंडूवर जरा सांभाळून खेळावे लागते त्यानंतर जम बसल्यावर तुम्ही राज्य करू शकता. मी मर्यादित षटकांच्या सामन्यात भारताकरता सलामीला जातो. कसोटी सामन्यात मला वाट बघायला लागायची ज्याची मला सवय राहिली नव्हती. त्याअर्थाने मला सलामीला फलंदाजीला जायचा फायदा झाला. संघ व्यवस्थापनाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ शकलो याचा आनंद होतो आहे. अजून बराच खेळ बाकी आहे. काम अर्धवट झाले आहे ते पूर्ण करायचे आहे,'' असे नत त्याने व्यक्त केले. 

कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी करायला दिल्याची संधी रोहित शर्माने अचूक साधली आणि भारतीय सलामीच्या जोडीने पहिल्या दिवशी चहापानापर्यतच्या चार तासांच्या खेळात बिनबाद 202 धावा फलकावर लावून संघाला झकास सुरुवात करून दिली. चहापानाच्या ठोक्यालाच मैदानावर पाऊस कोसळू लागला आणि थांबलेला खेळ परत चालू झाला नाही. रोहित शर्मा 115 धावांवर तर मयांक आगरवाल 84 धावांवर खेळत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com