रोहित कोरोनामुक्त होण्याची शक्यता

इंग्लंडविरुद्धची कसोटी; भारतीय संघाला दिलासा
Rohit Sharma Covid Positive
Rohit Sharma Covid Positive esakal

डब्लिन : भारतीय संघ येथे दोन टी-२० सामने खेळायच्या तयारीत असताना चर्चा मात्र भारतीय-इंग्लंड कसोटी सामन्याची रंगू लागली आहे. याला कारणे दोन आहेत. एक तर यजमान इंग्लंड संघ आक्रमक क्रिकेट खेळतो आहे, व दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची बाधा झाल्याने तो अत्यंत मोलाच्या एकमेव कसोटी सामन्यात खेळणार का नाही? असा प्रश्‍न या वेळी निर्माण झाला आहे, पण ‘सकाळ’ला समजलेल्या बातमीनुसार रोहित शर्मा कोरोनाच्या दुष्टचक्रातून मोकळा होऊन ‘एजबॅस्टन’ मैदानावर भारताचे नेतृत्व करायची शक्यता आहे.

कसोटीची योग्य तयारी करायच्या चांगल्या उद्देशाने भारतीय संघ अगोदर इंग्लंडला आला. त्याच तयारीचा भाग म्हणून लिसेस्टरशायर मैदानावर भारतीय संघ सराव सामन्याकरिता उतरला. पहिल्या डावात फलंदाजी केल्यावर अत्यंत सौम्य लक्षणे दिसू लागल्याने रोहितची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये त्याला कमी क्षमतेची कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. पाच दिवस विलगीकरणात घालवून योग्य उपचार करून रोहितला २९-३० तारखेला परत चाचणीकरिता नेण्याचा विचार आहे. तो कोरोनामुक्त होऊ शकला नाही, तर जसप्रीत बुमराकडे संघाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com