विराट-रोहित वाद टोकाला; रोहितच्या या कृतीमुळे उडणार भडका?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 जुलै 2019

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वाद काही संपायला तयार नाही. आता रोहित शर्माने केलेल्या एका कृतीमुळे हा वाद आता टोकाला जाण्याची चिन्हे आहेत. रोहितने कोहलीपाठोपाठ आता त्याची पत्नी अनुष्का शर्माला सोशल मीडियावर अनफॉलो केल्यामुळे त्यांच्यातील वादाला आता नवे रंगत येणार असल्याची चर्चा आहे. 

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वाद काही संपायला तयार नाही. आता रोहित शर्माने केलेल्या एका कृतीमुळे हा वाद आता टोकाला जाण्याची चिन्हे आहेत. रोहितने कोहलीपाठोपाठ आता त्याची पत्नी अनुष्का शर्माला सोशल मीडियावर अनफॉलो केल्यामुळे त्यांच्यातील वादाला आता नवे रंगत येणार असल्याची चर्चा आहे. 

रोहित आणि कोहली यांच्यातील कोणीच या विषयावर आजवर बोलले नाहीत. मात्र, रोहितने आता सोशल मीडियावर अनुष्काला अनफॉलो केले आहे. रोहितने यापूर्वीच कोहलीला सोशल मीडियावरुन अनफॉलो केले आहे. त्यावरुनही मागे बरीच चर्चा झाली होती. 

कोहली अजूनही रोहितला इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. मात्र, रोहितची पत्नी रीतिका कोहलीच्या फ्रेंडलिस्टमध्ये नाही. अनुष्काही रोहित आणि रितिका या दोघांनाही इंस्टाग्रामवर फॉलो करत नाही. तसेच रितिकाही कोहली व अनुष्काला फॉलो करत नाही. 

भारतीय संघात विश्वकरंडकातील उपांत्य फेरीनंतर मतभेद असल्याच्या खूप चर्चा सुरु आहेत. मात्र, या सर्व चर्चा अफवा असल्याचे भारतीय संघाच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच सांगितले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma unfollows Anushka Sharma on Social Media