रोहित शर्मा, विनेश फोगाट यांना खेलरत्न; समितीकडून चौघांची नावे निश्चित

टीम ई-सकाळ
Tuesday, 18 August 2020

भारताच्या धडाकेबाज सलामीवीर म्हणून, रोहित शर्माचा उल्लेख केला जातो. स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनंतर रोहितने सलामीची धुरा अतिशय समर्थपणे सांभाळली आहे.

नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाचा समजल्या जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी (Rajiv Gandhi Khel ratna award) भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांची नावे निश्चित झाली आहेत. यंदाच्या वर्षातील खेलरत्नसाठी चार खेळाडू शर्यतीत होते. क्रिडा मंत्रालयाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या 12 सदस्यीय समितीने अखेरच्या चार खेळाडूंच्या यादीतून रोहित आणि विनेश यांची निवड केली आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मरियप्पन यांचीही शिफारस करण्यात आली आहे. 

क्रीडा विषयक बातम्यांसाठी सकाळच्या वेबसाईटला भेट द्या - सकाळ स्पोर्ट्स 

या वेळी खेलरत्न पुरस्कारासाठी या दोघांशिवाय नेमबाज अंजुम मुदगिल, महिला टेबल-टेनिसपटू मनिका बत्रा, महिला हॉकी संघाची कर्णधार रानी रामपाल, नीरज चोप्रा आणि मुक्केबाज अमित पंघाल यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. याशिवाय अपूर्वी चंदेला, किदांबी श्रीकांत यांच्या नावाची शिफारसही करण्यात आली होती.

हिटमॅन रोहित शर्मा
भारताच्या धडाकेबाज सलामीवीर म्हणून, रोहित शर्माचा उल्लेख केला जातो. स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनंतर रोहितने सलामीची धुरा अतिशय समर्थपणे सांभाळली आहे. किंबहुना त्यानं सलामीला येत भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाचं स्वरूप बदलून टाकलंय. वन-डेमध्ये द्विशतक झळकावलेला रोहित हिटमॅन हे बिरूद समर्थपणे सांभाळतो. आंतरराष्ट्रीयच नव्हे तर, आयपीएलमध्येही त्यानं मुंबई इंडियन्सकडून खेळताना आपल्या खेळाबरोबरच नेतृत्व गुणांची झलक दाखवली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rohit sharma vinesh phogat recommended for rajiv gandhi khel ratna award