रोनाल्डोला जखडले होते, मेस्सी क्‍या चीज है!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 जून 2018

विश्‍वकरंडकातील सलामीच्या लढतीत अर्जेंटिना आइसलॅंडविरुद्ध किती गोल करणार याची चर्चा सुरू आहे, पण दोन वर्षांपूर्वी ख्रिस्तियानो रोनाल्डोला जखडून ठेवले होते, मग लिओनेल मेस्सी क्‍या चीज है, असेच प्रत्युत्तर आइसलॅंड देत आहे. 

मॉस्को - विश्‍वकरंडकातील सलामीच्या लढतीत अर्जेंटिना आइसलॅंडविरुद्ध किती गोल करणार याची चर्चा सुरू आहे, पण दोन वर्षांपूर्वी ख्रिस्तियानो रोनाल्डोला जखडून ठेवले होते, मग लिओनेल मेस्सी क्‍या चीज है, असेच प्रत्युत्तर आइसलॅंड देत आहे. 

दोन वर्षांपूर्वी आइसलॅंडने पोर्तुगालला 1-1 असे रोखत सर्वांना धक्का दिला होता. त्या वेळी रोनाल्डोची चांगलीच कोंडी केली होती. त्या वेळी रोनाल्डोने आइसलॅंडने कमालीचा बचावात्मक खेळ केला, असे सांगताना ते खूपच कोत्या मनोवृत्तीचे आहेत असे सांगितले होते. आइसलॅंडचे मार्गदर्शक योहान गुदमुंडसन नेमक्‍या याच गोष्टीकडे लक्ष वेधत होते. "तो काय बोलला होता आठवते ना. त्यांना आम्ही दुसरा गोल करू दिला नव्हता. आमची महत्त्वाच्या स्पर्धेतील पहिली लढत होती. तरीही आम्ही त्याला जिंकू दिले नव्हते,' 

आता प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सी आहे, याकडे लक्ष वेधल्यावर गुदमुंडसन काहीसे शांत होतात. ते म्हणाले, ""मेस्सीविरुद्ध लढत सोपी नसेल, पण त्याला जखडून ठेवले, तर त्याला गोल करता यणार नाही. हे घडले, तर आम्हाला आनंदच होईल. आता त्याला जखडून ठेवले, त्याच्याविरुद्ध जिंकलो, तर तो रोनाल्डोपेक्षा जास्तच चिडेल. आमच्यावर जास्त बचाव करण्याचीच वेळ येईल, पण त्यासाठी आम्ही तयार आहोत.'' 

अर्जेंटिनाचे आक्रमण आमच्यापेक्षा खूपच सरस आहे, पण त्यांच्या बचावात खूपच उणिवा आहेत. आम्ही त्याचा फायदा नक्कीच घेऊ शकतो. युरो स्पर्धेपेक्षा ही लढत जास्त अवघड असेल; पण आम्हीही तितकेच तयार आहोत असेही ते म्हणाले. 

Web Title: ronaldo is cant play so where is messi