रोनाल्डो वर्ल्ड कप खेळणार की तुरुंगात जाणार?

वृत्तसंस्था
सोमवार, 21 मे 2018

रोनाल्डो आणि कर 
1 कोटी 47 लाख युरो ः कर चुकवल्याचा रोनाल्डोवर आरोप 
2011 ते 2014 कालावधीतील कमाईवर कर भरणा नाही, 
कराचा पूर्ण भरणा करावा आणि बरोबर 10 कोटी युरोचा दंडही भरावा. 

 

माद्रिद - स्पेनमधील करचुकवेगिरीबद्दलचा तुरुंगवास टाळण्यासाठी ख्रिस्तियानो रोनाल्डोने एक कोटी 40 लाख युरो देण्याची तयारी दाखवली आहे. विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू होण्याच्या सुमारास हे प्रकरण गंभीर होऊ शकते आणि रोनाल्डोला वर्ल्ड कप स्पर्धेऐवजी तुरुंगात जाण्याचीही वेळ येऊ शकेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

रेयाल माद्रिदचा स्टार आणि स्पेनमधील यंत्रणा यांच्यातील कायदेशीर लढाई कित्येक महिने सुरू आहे. त्याने प्रथमच थेट प्रस्ताव दिला आहे, असे समजते. तुरुंगवास टळणार असेल, तर आपण एक कोटी 40 लाख युरो (1 कोटी 22 लाख पौंड) स्पॅनिश कर प्राधिकरणास देण्यास तयार आहोत, तसेच करचुकवेगिरीतील फोर काउंटस्‌ मान्य करायला तयार आहोत. त्याचबरोबर त्याने आपले सल्लागार सुपर एजंट जॉर्ज मेंडीस यांच्याविरुद्धचे आरोपही रद्द करण्याची सूचना केली आहे. 

स्पेन कोषागार रोनाल्डोच्या प्रस्तावावर विचार करीत आहे. त्यांनी याबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत. आता रोनाल्डोचा प्रस्ताव नाकारला गेला, तो दोषी ठरला, तर त्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकेल. रोनाल्डोची 2017 ची कमाई 9 कोटी 30 लाख डॉलर असल्याचे फोर्बस्‌ मासिकाने म्हटले आहे. पोर्तुगालचा स्टार रोनाल्डो हे सर्व प्रकरण विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी निकालात काढण्यास उत्सुक आहे.

रोनाल्डो आणि कर 
1 कोटी 47 लाख युरो ः कर चुकवल्याचा रोनाल्डोवर आरोप 
2011 ते 2014 कालावधीतील कमाईवर कर भरणा नाही, 
कराचा पूर्ण भरणा करावा आणि बरोबर 10 कोटी युरोचा दंडही भरावा. 

 

Web Title: Ronaldo go to jail or playing World Cup?