Ronaldo's hat trick during Portugal's thrilling 3-3 World Cup draw with Spain
Ronaldo's hat trick during Portugal's thrilling 3-3 World Cup draw with Spain

रोनाल्डोची अफलातून हॅटट्रिक पोर्तुगालने मातब्बर स्पेनला बरोबरीत रोखले

सोची : चौथ्या मिनिटाला पेनल्टी किक, 44 व्या मिनिटाला मैदानी गोल आणि 88 व्या मिनिटाला फ्री किक अशी अष्टपैलू हॅटट्रिक करणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने रेयाल माद्रिद या आपल्या व्यावसायिक क्‍लबमधील सहकाऱ्याचा स्पेनविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत सुरवातीलाच हायव्होल्टेज ठरलेला पोर्तुगाल-स्पेन सामना 3-3 बरोबरीत सुटला. 

रोनाल्डोला विश्वकरंडक स्पर्धेत अजूनपर्यंत स्पेनविरुद्ध एकही गोल करता आलेला नव्हता; पण आज तीन गोल करून भरपाई केली. चौथ्याच मिनिटाला स्पेनच्या गोलक्षेत्रात रेयाल माद्रिदचाच सहकारी नॅचोने रोनाल्डोला अवैधपणे पाडले आणि रेफ्रींनी क्षणाचाही विलंब न लावता पेनल्टी दिली. रोनाल्डोनेच ही पेनल्टी घेत पहिला गोल केला. 

रोनाल्डोप्रमाणे स्पेनचा स्ट्रायकर असलेल्या दिएगो कॉस्टाने पोर्तुगालच्या चार खेळाडूंना चकवून 24 व्या मिनिटाला केलेला गोल स्पेनच्या आव्हानात आत्मविश्वास वाढवणारा ठरला. त्यानंतर स्पेनची दोन आक्रमणे थोडक्‍यात फसली. 

सामन्याची रंगत उत्तरोत्तर वाढत होती. चेंडूवर अधिक काळ ताबा स्पेनचा होता; परंतु मध्यंतराला एक मिनीट शिल्लक असताना रोनाल्डोने पुन्हा संधी साधली. या वेळीही स्पेनचा गोरलक्षक जी हेआ गोलरक्षणात पुन्हा कमजोर ठरला. 

टीकी टाका या तंत्राने खेळणाऱ्या स्पेनने उत्तरार्धात तीन मिनिटांत गोल केले. यातील पहिला गोल कॉस्टाने केला. 55 मिनिटांच्या बरोबरीनंतर नॅचोने दूरवरून मारलेली किक स्पेनला 3-2 आघाडीवर नेणारी ठरली. 

स्पेन हा सामना जिंकणार असे वाटत असताना 88 व्या मिनिटाला पोर्तुगालला फ्रीकिक मिळाली आणि त्यावर प्रथम त्याने कमालीची एकाग्रता दाखवली. त्यानंतर समोर स्पेन खेळाडूंची वॉल तयार असतानाही हवेत चेंडूला गोलाकार दिशा देत केलेला गोल सर्वांना अचंबित करणारा होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com