रोनाल्डोचा रेयाल माद्रिदच विजेता

पीटीआय
मंगळवार, 23 मे 2017

माद्रिद - ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या रेयाल माद्रिदने अखेर स्पॅनिश फुटबॉल लीगच्या विजेतेपदाच्या शर्यतीत लिओनेल मेस्सीच्या बार्सिलोनास मागे टाकत बाजी मारली. रेयालने मॅलागाचा २-० असा पराभव करीत विजेतेपद ३३ वे ला लिगा विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

रोनाल्डोने या स्पर्धेतील या मोसमातील ४० वा गोल करीत रेयालचे खाते उघडले आणि करीम बेनझेमाने उत्तरार्धातील दहाव्या मिनिटास गोल करीत रेयालचे यश पक्के केले. ही लढत रेयालने गमावली असती, तर बार्सिलोनाने ही स्पर्धा जिंकली असती. मेस्सीच्या बार्सिलोनाने अखेरच्या साखळी लढतीत एईबारचा पिछाडीवरून ४-२ असा पराभव केला.

व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीतील संस्मरणीय दिवसात याची गणना होईल. खेळाडू म्हणून रेयालसाठी यशस्वी झालो होतो. आता त्यांचा मार्गदर्शक म्हणूनही जिंकलो आहे, असे रेयालचे मार्गदर्शक झिनेदिन झिदान यांनी सांगितले. रेयालला विजेतेपद निश्‍चित करण्यासाठी बरोबरी पुरेशी होती. आक्रमक रेयालला रोनाल्डोने काही मिनिटांतच खाते उघडून दिले आणि त्यांचे विजेतेपद निश्‍चित झाले. रेयालचा कस त्यानंतर मॅलागाने पाहिला खरा; पण रोनाल्डो व त्याच्या सहकाऱ्यांनी ताकद सिद्ध केली.

आर्सेनलला आर्थिक फटका
लंडन ः आर्सेनल २० वर्षांत प्रथमच चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरले. यामुळे आगामी मोसमात त्यांचे उत्पन्न साडेसहा कोटी डॉलरनी (सुमारे पाच कोटी पौंड) कमी होईल, असा अंदाज आहे. आर्सेनलने एव्हर्टनला ३-१ हरवले; पण लिव्हरपूलने मिडल्सब्रोला ३-० आणि मॅंचेस्टर सिटीने वॅटफोर्डला ५-० असे हरवत आर्सेनलला प्रीमियर लीगमधील अव्वल चार संघातून बाहेर ठेवले.  लिव्हरपूल २०१४-१५ नंतर प्रथमच चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरले आहेत. लिव्हरपूलचे ७६ गुण झाले, तर आर्सेनलचे ७५. चॅम्पियन्स लीगसाठी चेल्सी, टॉटनहॅम हॉटस्‌पूर, मॅंचेस्टर सिटी आणि लिव्हरपूल पात्र ठरले आहेत.

Web Title: Ronaldo's Real Madrid winner