World Cup 2019 : टेलर सर्वांत वयस्क, तर आर्चर सर्वांत युवा!

वृत्तसंस्था
रविवार, 14 जुलै 2019

यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणाऱ्या प्रतिस्पर्धी संघातील न्यूझीलंडचा रॉस टेलर सर्वात वयस्क, तर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. आर्चरचे वय 24 वर्षे 104 दिवस इतके आहे. त्याने आतापर्यंत 19 बळी मिळविले आहेत.

वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणाऱ्या प्रतिस्पर्धी संघातील न्यूझीलंडचा रॉस टेलर सर्वात वयस्क, तर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. आर्चरचे वय 24 वर्षे 104 दिवस इतके आहे. त्याने आतापर्यंत 19 बळी मिळविले आहेत.

टेलरचे वय 35 वर्षे 128 दिवस असून, यंदाची स्पर्धा त्याला फारशी यशस्वी गेलेली नाही. त्याने 10 सामन्यातून 8 डावांत 335 धावा केल्या. त्याचवेळी अलिकडच्या काळातील क्रिकेटपटूंमध्ये केन विल्यमसन अंतिम सामना खेळणारा तरुण कर्णधार ठरला आहे. त्याचे वय 28 वर्षे 340 दिवस आहे. विश्‍वकरंडकाच्या अंतिम समान्यात खेळणारा सर्वात युवा क्रिकेटपटूचा विक्रम कपिलदेवच्या नावावर आहे. 1983च्या अंतिम सामन्यात त्याने भारताचे नेतृत्व केले, तेव्हा तो 24 वर्षे 170 दिवसाचा होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ross taylor is the most aged player while Jofra archer is the youngest in world cup 2019