४० वर्षीय चेन्नईच्या कर्णधारावर लक्ष्य, राजस्थान रॉयलविरुद्ध सामना

‘अखेर’ च्या लढतीसाठी धोनी आज मैदानात ?
RR vs CSK Dhoni last Match
RR vs CSK Dhoni last Match sakal

मुंबई : ब्रेबॉर्न स्टेडियमवर उद्या राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात त्यांचा अखेरचा साखळी सामना होत आहे. महेंद्रसिंग धोनीचा हा अखेरचा सामना ठरू शकेल. त्यामुळे सामन्याच्या निकालापेक्षा या लढतीत संपूर्ण भारतीय क्रिकेटचे लक्ष धोनीवर असणार आहे.

४० वर्षांचा धोनी पूर्ण तंदुरुस्त असला आणि सामना जिंकून देण्याची क्षमता असली तरी अजून किती खेळणार याबाबत नेहमीच चर्चा केली जात असते. यंदा आयपीएलच्या सुरुवातीसच त्याने रवींद्र जडेजाकडे नेतृत्व दिल्यामुळे या चर्चांना उधाण आले होते. यंदाची ही त्याची अखेरची आयपीएल असणार, असे अगोदरपासूनच बोलले जात होते.

जडेजा दुखापतीमुळे गेल्या काही सामन्यांपूर्वीच आयपीएलमधून बाहेर पडला आणि उर्वरित सामन्यांसाठी धोनी पुन्हा कर्णधार झाला. धोनी पुढचा मोसम खेळणार नसला तरी उद्याचा सामना हा त्याचा अखेरचा सामना ठरू शकेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला त्याने अगोदरच अलविदा केले आहे.धोनीने भारतीय संघाचा कसोटी, मर्यादित षटकांचा कर्णधार आणि खेळाडू म्हणूनही निवृत्ती अचानकपणे जाहीर करून सर्वांना धक्का दिला आहे त्यामुळे उद्याच्या सामन्यात धोनीच्या प्रत्येक कृतीवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतील.

मोसमाची सांगता विजयाने ?

गमावण्यासारखे काहीच नसलेल्या चेन्नईचे १३ सामन्यांतून आठ गुण झाले आहेत. गतविजेते असल्यामुळे आता किमान यंदाच्या मोसमाची सांगता तरी विजयाने करावी यासाठी त्यांचा निश्चितच प्रयत्न असेल. २०२० च्या आयपीएलमध्येही त्यांना शेवटून दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

निवृत्तीबाबतचा प्रश्न अपेक्षित

गत आयपीएल स्पर्धेतही धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा अशाच रंगल्या होत्या, परंतु एका सामन्यात नाणेफेकीच्यावेळी विचारण्यात आलेल्या निवृत्तीबाबतच्या प्रश्नावर धोनीने `निश्‍चितच नाही` असे उत्तर दिले होते. उद्याही नाणेफेकीच्या वेळी असा प्रश्न अपेक्षित आहे, परंतु `गुगली` टाकण्यात हुशार असलेला धोनी निवृत्तीबाबतच्या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यातही ठेऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com