ऋतुराजच वाढदिवस अन् सायली संजीवने केले सेलिब्रेशन: Sayali Sanjeev | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ruturaj Gaikwad Sayali Sanjeev Happy Birthday

Sayali Sanjeev: ऋतुराजच वाढदिवस अन् सायली संजीवने केले सेलिब्रेशन

टीम इंडियाचा धडाकेबाज फंलदाज ऋतुराज गायकवाड आज २६ वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र, क्रिकेट जगतात चर्चा सुरु आहे ती म्हणजे मराठी अभिनेत्री सायली संजीवने केलेल्या सेलिब्रेशनची. सायलीचे केक कट करतेले काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Ruturaj Gaikwad Sayali Sanjeev Happy Birthday celebration photo )

पुण्यात १९९७ ला जन्मलेला ऋतुराज गेल्या काही दिवसांपासून सायली संजीव सोबतच्या कथित अफेअरमुळे चर्चेत आहे. याबाबत अनेकदा ऋतुराजने भाष्य केलं आहे.

विशेष म्हणजे, मराठी सिनेसृष्टीतील लाडकी अभिनेत्री सायलीचाही वाढदिवस आज आहे. अशातच तिने केट कट करत असलेले फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यामुळे ऋतुराजच्या वाढदिवसाला सायलीने सेलिब्रेशन केले. अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव यांच्या रिलेशनशिपची बातमी सोशल मीडियावर उफाळून आली जेव्हा ऋतुराजने सायली संजीवच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट केली. त्यावर क्षणाचा विलंब न करता सायलीने प्रतिक्रिया दिली.

ऋतुराजविषयी जरा स्पष्टच बोलली सायली संजीव

काही दिवसांपूर्वी, सायली आणि ऋतुराज एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला असताना आता अभिनेत्रीने मोठा खुलासा केला. 'जेव्हा आमच्या नात्याबद्दल चर्चा रंगू लागल्या तेव्हा त्याचा परिणाम आमच्या मैत्रीवर झाला.

आता आमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. आता आम्ही मित्रासारखं बोलू देखील शकत नाही. माझं नाव त्याच्यासोबत जोडलं जातंय हे देखील मला माहित नव्हतं.

आमच्या वयाबद्दल देखील सर्वत्र चर्चा रंगू लागल्या. मी 29 वर्षांची आणि ऋतुराज 25 वर्षांचा आहे. आम्ही सुरुवातीला बोलायचो पण आता आमच्यात गप्पा होत नाहीत.' अशा भावनाही सायलीने व्यक्त केल्या होत्या.