6,6,6,6,6... IPL 2023 पूर्वी रोव्हमन पॉवेलचे वादळ, वेस्ट इंडिजचा विजय! राजधानी दिल्लीत वाटले पेढे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rovman Powell IPL 2023 Delhi Capitals

6,6,6,6,6... IPL 2023 पूर्वी रोव्हमन पॉवेलचे वादळ, वेस्ट इंडिजचा विजय! राजधानी दिल्लीत वाटले पेढे

Rovman Powell IPL 2023 Delhi Capitals : दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रोमांचक तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 25 मार्चला सेंच्युरियन येथे खेळल्या गेला. पावसामुळे 20-20 षटकांचा हा सामना 11-11 षटकांचा करण्यात आला, जो कॅरेबियन संघाने वेगवान फलंदाजी करत जिंकला. संघाचा नवा कर्णधार रोव्हमन पॉवेलने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याचवेळी वेस्ट इंडिजसह दिल्ली कॅपिटल्सही त्याच्या फलंदाजीवर खूश असतील.

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रोव्हमन पॉवेल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात कर्णधारपदावर पदार्पण केले. या सामन्यात पॉवेल 238च्या अविश्वसनीय स्ट्राइक रेटने फलंदाजी करत 18 चेंडूत 43 धावा ठोकल्या, ज्यात त्याच्या बॅटमध्ये 1 चौकार आणि 5 गगनाला भिडणारे षटकार दिसले.

इतकंच नाही तर तो शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि आपल्या संघाला तीन विकेट्सने विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पॉवेलला त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

त्याचवेळी पॉवेलच्या या घातक फॉर्ममुळे आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्स खूप आनंद झाली आहे. पॉवेल आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो आणि तो लवकरच आयपीएल 2023 साठी संघात सामील होणार आहे. नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी पॉवेल या फॉर्ममध्ये असणे डीसीसाठी चांगले आहे.

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत यजमान दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 11 षटकांत 8 गडी गमावून 131 धावा केल्या. आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक 48 धावा केल्या.

132 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना कॅरेबियन संघाने 3 गडी आणि 3 चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य गाठले. या विजयासह वेस्ट इंडिजने आता मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.