सचिनने थांबवल नाहीतर धोनीमुळे निवृत्ती घेणार होतो - सेहवाग

धोनीने वगळल्यानंतर सेहवाग वनडे क्रिकेट सोडणार होता
Sachin stopped me  Virender Sehwag
Sachin stopped me Virender Sehwag

वीरेंद्र सेहवाग हा भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सेहवागची खेळण्याची शैली सारखीच होती. पण सेहवागच्या कारकिर्दीत एक वेळ अशी आली जेव्हा या सलामीवीराच्या मनात एकदिवसीय फॉर्मेटमधून निवृत्तीचा विचार आला. पण सचिन तेंडुलकरच्या सांगण्यावरून त्याने आपला विचार बदलला. 2008 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तत्कालीन कर्णधार धोनीने सेहवागला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले होते. त्यानंतर त्याला निवृत्त व्हायचे होते. मात्र सचिनने त्याला निवृत्ती घेण्यापासून रोखले.

Sachin stopped me  Virender Sehwag
फुटबॉलचा आदर्श घ्या, द्विपक्षीय टी 20 मालिका बंद करा : शास्त्री

क्रिकबझ शो मध्ये सेहवाग म्हणाला, २००८ मध्ये जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होतो तेव्हा माझ्या मनात निवृत्तीचा विचार आला होता. पण कसोटी मालिकेत पुनरागमन करत मी 150 धावा केल्या. एकदिवसीय सामन्यांमध्ये 3-4 वेळा प्रयत्न करूनही धावा करता आल्या नाहीत. सेहवागने त्या तिरंगी मालिकेतील चार सामन्यांमध्ये 6, 33, 11 आणि 14 धावा केल्या होत्या. त्यामुळे धोनीने मला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले तेव्हा माझ्या मनात एकदिवसीय क्रिकेट सोडण्याचा विचार आला होता.

Sachin stopped me  Virender Sehwag
धोनी अडकला वादात, बिहारच्या बेगूसरायमध्ये FIR दाखल - काय आहे प्रकरण

सचिनचा उल्लेख करताना तो म्हणाला, सचिन तेंडुलकरने मला त्यावेळी निवृत्ती घेण्यापासून रोखले होते. हा माझ्या जीवनाचा वाईट टप्पा होता. या दौऱ्यानंतर घरी जा आणि नीट विचार करा. त्यानंतर पुढे काय करायचे ते ठरव. मी नशीबवान होतो की त्यावेळी मी माझ्या निवृत्तीची घोषणा केली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com