सचिनचा फोन येणे माझ्यासाठी स्वप्नासारखेच!

वृत्तसंस्था
सोमवार, 22 जुलै 2019

ऍथलेटिक्‍स क्रीडा प्रकारात युरोपच्या तीन आठवड्याच्या दौऱ्यात पाच सुवर्णपदके मिळविणाऱ्या "ढिंग एक्‍स्प्रेस' हिमा दास हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा यात समावेश आहे. हिमाने या सर्वांचे आभार मानले आहेत.

नवी दिल्ली : ऍथलेटिक्‍स क्रीडा प्रकारात युरोपच्या तीन आठवड्याच्या दौऱ्यात पाच सुवर्णपदके मिळविणाऱ्या "ढिंग एक्‍स्प्रेस' हिमा दास हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा यात समावेश आहे. हिमाने या सर्वांचे आभार मानले आहेत.

यातही हिमा सचिनच्या संदेशाने हरखून गेली आहे. "सचिन तेंडुलकर यांनी मला फोन करणे हे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखेच आहे.'अशी प्रतिक्रिया हिमाने व्यक्त केली असून, ट्‌विट करूनही तिने सचिनचे आभार मानले आहेत.""तुमचा फोन आल्याने मी कमालीची हरखून गेली आहे.

आपला शुभेच्छा संदेश माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. मी माझ्या प्रयत्नात कुठेही कमी पढणार नाही.'असे हिमान ट्‌विट केले आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती कोविंद यांनीही हिमाची कामगिरी भारतीयांचा अभिमान वाढवणारी आहे. तिचे अभिनंदन ! असा संदेश ट्‌विट करून तिच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sachin tendulkar congratulates hima das