पुरग्रस्तांसाठी सचिन धावला देवासारखा; केले मदतीचे आवाहन

Sakal | Wednesday, 14 August 2019

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापूराने थैमान मांडले आहे. पूरग्रस्तांसाठी आता देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे पाठोपाठ आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही पुरग्रस्तांना मदत करत इतरांनाही मदतीचे आवाहन केले आहे. 

मुंबई : कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापूराने थैमान मांडले आहे. पूरग्रस्तांसाठी आता देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे पाठोपाठ आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही पुरग्रस्तांना मदत करत इतरांनाही मदतीचे आवाहन केले आहे. 

''भारतातील अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे. पण, आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आता तेथील लोकांना मदतीची गरज आहे. मी माझ्याकडून मदत केली आहे. पंतप्रधान मदतनिधीमार्फत मी मदत केली आहे. आता तुम्हा सुद्धा त्यांना मदत करावी ही विनंती,'' असे ट्विट त्याने केले आहे.