"पिछे तो देखो" सचिनच्या व्हिडिओमध्ये मागे काय घडलं ? बिचाऱ्या गोवेकराचा व्हिडिओ लक्ष देऊन बघा | Sachin Tendulkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Tendulkar

"पिछे तो देखो" सचिनच्या व्हिडिओमध्ये मागे काय घडलं ? बिचाऱ्या गोवेकराचा व्हिडिओ लक्ष देऊन बघा

Sachin Tendulkar In Goa : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर काही दिवसांआधी गोव्याला गेला होता. सचिन गोव्यात येण्याआधी अगदी कोल्हापुरातील नृसिंहवाडील मंदिरातील पहाटेच्या आरतीपासून ते बेळगाव-गोवा मार्गावर चहासाठी थांबण्यापर्यंत अनेक गोष्टींची चर्चा झाली होती. त्यातच आता सचिनच्या गोव्यातील एका व्हिडिओची सोशल मीडियात जोरदार चर्चा होत आहे.

हेही वाचा : हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

सचिन तेंडुलकर या व्हिडिओमध्ये समुद्र किनाऱ्यावर दिसत आहे. यांच्या मागे चक्क एक वॉटर स्कूटर एका व्यक्तीच्या अंगावर गेली. सचिनच्या व्हिडिओच्या पार्श्वभुमीला घडलेली ही घटना अनेक युजर्सच्या लक्षात आली. सचिनने या गोवा सफारीबाबत अनेक अविश्वसनीय अनुभव सांगितले आहे. सचिनने त्याचे अनेक फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियात शेअर केले आहेत.

हेही वाचा: Kapil Dev : टीम इंडियासुद्धा नवे चोकर्स ? वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कप्तानची घणाघाती टीका

एका व्हिडिओ मध्ये सचिन बाणावली किनाऱ्यावर स्थानिक कोळी बांधवांसोबत बोलत आहे. त्या व्हिडिओला कॅप्शन देताना सचिन लिहितो की, गोव्यातील मच्छिमारांसोबत एक मस्त सकाळ. कोळी बांधवांनी सचिनला पारंपरिक मासेमारीबाबतची अनेक माहिती दिली. सचिनने यावेळी गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर वॉटर स्पोर्टसचाही आनंद लुटताना दिसला. या व्हिडिओ मध्ये सचिनच्या मागे दिसत की, एक व्यक्ती चक्क वॉटर स्कुटर खाली आला. सुदैवाने त्या व्यक्तीला काही दुखापत झाली नाही.

ट्विटरवर एका नेटकऱ्याने या व्हिडिओची नेमकी ती घटना दाखवणारी क्लिप शेअर केली आहे. याबाबत अनेक मीम्सही तयार झाले आहेत. एका इन्स्टाग्राम युजरने लिहिले आहे की, जेट स्कीच्या खाली आलेल्या त्या व्यक्तीकडे सर्वानी दुर्लक्ष केले. तर आणखी एकाने लिहिले की, पिछे तो देखो. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.