Teacher's Day 2019 : सचिन म्हणतोय, सरांचा तो सल्ला अजूनही पाळतोय

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

शिक्षक फक्त शिक्षण देत नाहीत तर मूल्यही शिकवतात. आचरेकर सरांनी मला नेहमी सरळ खेळण्याचा सल्ला दिला. मग ते मैदानावर असो किंवा जीवनात. माझ्या आयुष्यात त्यांचे योगदान खूप मोठे आहे आणि मी त्याबद्दल त्यांचा नेहमी ऋणी राहिल. त्यांचे सल्ले मी आजही पाळतो,

मुंबई : पाच सप्टेंबर- शिक्षक दिन. शिक्षकांचा गौरव, कौतुक, सन्मान करण्याचा दिवस. खरे पाहता हा सन्मान कोण्या व्यक्तीचा नसून, तो एका परंपरेचा, इतिहासाचा, संस्कृतीचा, श्रेष्ठत्वाचा, शिल्पकाराचा गौरव आहे. सोशल मीडियावर सर्वजण आपापल्या गुरुवर्यांना अभिवादन करत आहेत. भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरनेही त्याचे गुरु रमाकांत आचरेकरांना शिक्षकदिनानिमित्त अभिवादन केले आहे. 

''शिक्षक फक्त शिक्षण देत नाहीत तर मूल्यही शिकवतात. आचरेकर सरांनी मला नेहमी सरळ खेळण्याचा सल्ला दिला. मग ते मैदानावर असो किंवा जीवनात. माझ्या आयुष्यात त्यांचे योगदान खूप मोठे आहे आणि मी त्याबद्दल त्यांचा नेहमी ऋणी राहिल. त्यांचे सल्ले मी आजही पाळतो,'' असे ट्विट त्याने केले आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Tendulkar pays tribute to his teacher Ramakant Achrekar on Teachers Day 2019