विराटने माझा विक्रम मोडूदे, मग बघा कसलं भारी सरप्राईज देतो त्याला

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

''ज्या दिवशी विराट कोहली माझा विक्रम मोडेल, त्यादिवशी मी स्वतः जाऊन त्याला शँपेनची बाटली देईन. आम्ही दोघं एकत्र बसून शँपेन पिऊ.''

मुंबई : भारतीय आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतील 42 वे शतक झळकाविले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे. मात्र, कोहलीने माझा विक्रम मोडला तर मी त्याला स्वतः जाऊन त्याला शँपेनची बाटली देईन असे सचिनने नुकतेच सांगितले आहे. 

मुंबईमध्ये क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यत सचिनने आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, ''ज्या दिवशी विराट कोहली माझा विक्रम मोडेल, त्यादिवशी मी स्वतः जाऊन त्याला शँपेनची बाटली देईन. आम्ही दोघं एकत्र बसून शँपेन पिऊ.''

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर
49 शतके जमा आहेत. सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी विराटला आणखी ८ शतकांची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Tendulkar praises Virat Kohli for his century against WI