Sachin Tendulkar : सचिनने शेअर केला बायको अन् लेकीसोबतचा चुल पेटवतानाचा फोटो; अर्जुनची आठवण काढत म्हणे... | Sachin Tendulkar Family Photo | Sachin Tendulkar Birthday | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Tendulkar Share Photo with wife anjali and daughters sara Tendulkar with special caption

Sachin Tendulkar : सचिनने शेअर केला बायको अन् लेकीसोबतचा चुल पेटवतानाचा फोटो; अर्जुनची आठवण काढत म्हणे…

जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरने नुकतीच आपल्या आयुष्याची 50 वर्षे पूर्ण केली. संपूर्ण क्रिकेट जगतासोबतच जगभरातील चाहत्यांने सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सचिनने आता आपल्या कुटुंबासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सचिनसोबतच्या या फोटोमध्ये त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर आहे. सचिनने या फोटोला खास कॅप्शन दिलं आहे.

सचिनने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो निसर्गाचा आनंद लुटताना दिसत होता. गावात पारंपारिक पद्धतीने जेवण बनवतानाचा फोटो त्याने पोस्ट केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहीलं की, तुम्ही रोज रोज अर्धशतक ठोकत नाही, पण जेव्हा तुम्ही ते करता तेव्हा ते जे खरंच महत्त्वाचे असतात त्यांच्यासोबत सेलिब्रेट करायला हवे. अलीकडेच मी माझा 50 वा वाढदिवस माझी टीम - कुटुंबासोबत एका शांत गावात साजरा केला.

या कॅप्शनमध्ये सचिनने मुलगा अर्जुनबद्दल लिहिले आहे की, या निमित्ताने आम्ही त्याला मिस करत आहोत. सध्या अर्जुन आयपीएल खेळण्यात व्यस्त आहे. असेही सचिनने म्हटले आहे. सचिनचा ५० वा वाढदिवस तो कुटुंबासोबत मोठ्या आनंदात साजरा करत असल्याचं या फोटोत स्पष्ट दिसत आहे.

अर्जुनने आयपीएलमध्ये पदार्पण

अर्जुन तेंडुलकर गेल्या 2 हंगामात मुंबई इंडियन्ससोबत आहे. यंदा मात्र अर्जुनला पदार्पण सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. मुंबईने अर्जुनला 4 सामन्यात संधी दिल्यानंतर त्याला प्लेइंग 11 मधून वगळले. अर्जुनने आतापर्यंत 30.67 च्या सरासरीने 3 बळी घेतले आहेत.

टॅग्स :CricketSachin Tendulkar