सचिन तेंडुलकरच्या आयुष्यातील 'तो' क्षण ठरला क्रीडाविश्वात सर्वोत्तम

वृत्तसंस्था
Tuesday, 18 February 2020

,'' अद्भुत. विश्वकरंडक जिंकल्याचा क्षण खूपच जिव्हाळाचा आहे. ही भावना मी शब्दांत व्यक्त नाही करु शकत. अशा खूप कमी घटना असतात जिथे सगळा देश एकत्रितरित्या एखादी गोष्ट साजरी करतो. याच क्षणामुळे हे कळते की खेळ किती पॉवरफुल आहे आणि आपल्या आयुष्यात काय जादू करु शकतो. मी आताही तो क्षण पाहिला की तो सदैव माझ्यासोबत राहतो.''

बर्लिन : गेल्या 20 वर्षांत क्रिकेट क्षेत्रात अनेक अशा घटना ज्यांनी क्रिकेटप्रेमींच्या चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले आहे. भारतीय क्रिकेटमधल्या अशाच एका घटनेने लॉरियस स्पोर्टींग मोमेंटमध्ये बाजी मारली आहे. 2011मध्ये भारतीय संघाने विश्वकरंडक जिंकल्यानंतर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सर्व सहकऱ्यांनी खांद्यावर उचलून घेतले होते. हाच क्षण गेल्या 20 वर्षातील 'लॉरियस स्पोर्टींग मोमेंट' ठरला आहे. 

क्रीडा क्षेत्रात हा पुरस्कार मानाचा मानला जातो. सर्वाधिक मतांसह या क्षणाने 'लॉरियस स्पोर्टींग मोमेंट' हा पुरस्कार पटकाविला आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर तो म्हणाला,'' अद्भुत. विश्वकरंडक जिंकल्याचा क्षण खूपच जिव्हाळाचा आहे. ही भावना मी शब्दांत व्यक्त नाही करु शकत. अशा खूप कमी घटना असतात जिथे सगळा देश एकत्रितरित्या एखादी गोष्ट साजरी करतो. याच क्षणामुळे हे कळते की खेळ किती पॉवरफुल आहे आणि आपल्या आयुष्यात काय जादू करु शकतो. मी आताही तो क्षण पाहिला की तो सदैव माझ्यासोबत राहतो.''

Image result for sachin tendulkar 2011 world cup final Images

विश्वकरंडक जिंकल्याच्या त्या क्षणाबद्दल बोलताना तो म्हणाला, ''माझा प्रवास 1983मध्ये मी दहा वर्षांचा असताना सुरु झाला होता. त्यावेळी भारताने विश्वकरंडक जिंकला होता आणि सगळे उत्साहात असल्यामुळे मीसुद्धा उत्साहात होतो. मला फक्त एवढीच कल्पना होती की देशाने काहीतरी खूप मोठे कमावले आहे आणि मलासुद्धा हाच अनुभव घ्यायचा आहे आणि तिथूनच माझा प्रवास सुरु झाला. तो माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानास्पद क्षण होता. तब्बल 22 वर्षे मी या ट्रॉफीची वाट पाहली होतो. मी या सगळ्या वर्षांमध्ये मी कधीच आशा सोडली नव्हती. मी माझ्या देशवासीयांच्या वतीनेच ती ट्रॉफी उंचावत होतो.''

पाचवेळा अयशस्वी
सचिन तेंडुलकरने 1992मध्ये पहिला विश्वकरंडक खेळला होता. त्याने कारकिर्दीत तब्बल सहा विश्वकरंडक खेळले. त्यातील पाच विश्वकरंडकामध्ये भारताला विजेतेपद पटकाविता आला नाही. अखेर सहाव्या प्रयत्नात भारताने विश्वकरंडकात विजेतेपद पटकाविले.  

पुरस्काराचे पहिलेच वर्ष
लॉरियसने 2000-2020 या दोन दशकातील सर्वोतम विजयी क्षणाला 'लॉरियस स्पोर्टींग मोमेंट' हा पुरस्कार जाहीर केला गेला. चाहत्यांना त्यांच्या सर्वांत आवडत्या क्षणाला मते द्यायची होती. त्यातून सचिन तेंडुलकरने विश्वकरंडक जिंकला या क्षणाला सर्वाधिक मते मिळाली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Tendulkar Wins Laureus Sporting Moment Award For 2011 World Cup Triumph