कसोटी चांगल्या खेळपट्टीवर खेळावा की राव : सचिन तेंडुलकर

वृत्तसंस्था
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

मुंबई : कसोटी क्रिकेट जिवंत ठेवयाचे असेल, तर कसोटी सामने चांगल्या खेळपट्टीवर खेळविले जावेत असे मत भारताचा विक्रमादित्य फलंदाज सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले आहे. 

मुंबई : कसोटी क्रिकेट जिवंत ठेवयाचे असेल, तर कसोटी सामने चांगल्या खेळपट्टीवर खेळविले जावेत असे मत भारताचा विक्रमादित्य फलंदाज सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले आहे. 

आपले मत पटवून देताना सचिनने खेळपट्ट्या कसोटी क्रिकेटचे हृदय असतात आणि त्याच कमजोर असतील, तर मग कसोटी क्रिकेट कसे टिकणार असे सांगून सचिन म्हणाला,""कुठल्या दर्जाच्या खेळपट्ट्यांवर कसोटी सामने खेळले जातात यावर कसोटीचे भवितव्य अवलंबून असते. खेळपट्ट्या जर चांगल्या असतील, तर क्रिकेट कधीच कंटाळवाणे होणार नाही. प्रत्येकवेळी सामने उत्कंठावर्धकच होतील. अशा खेळपट्ट्यांवर विलक्षण गोलंदाजी, जबरदस्त फलंदाजी बघायला मिळेल आणि क्रिकेट चाहत्यांना हेच हवे आहे.'' 

मुंबई हाफ मॅरेथॉनच्या निमित्ताने येथे आलेल्या सचिनने पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला,""गेल्या आठवड्यात ऍशेस मालिकेत जोफ्रा आर्चर आणि स्टीव स्मिथ यांच्यातील दंद्वाने पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटकडे लक्ष वेधले. आर्चरच्या उसळत्या चेंडूने स्मिथ जखमी झाला हे दुर्दैवी आहे. पण, जेव्हा आर्चरने आव्हान दिले, तेव्हा चुरस निर्माण झाली. या कसोटी सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे जवळपास दीड दिवस वाया गेला होता. तरी देखील सामने अखेरच्या दिवशी अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलसा होता. इंग्लंडने आवळश्‍यक गडी बाद करण्यासाठी प्रयत्न केले, तर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी त्यांना निराश करून सामना वाचविण्यासाठी शर्थ केली.'' 

एकदिवसीय क्रिकेट विश्‍वकरंडकाचा प्रभाव पंधरा दिवसात कमी झाला. कसोटी क्रिकेटकडे सर्वांचे लक्ष वेधले आणि हेच कसोटी क्रिकेटचे महत्व आहे. त्यासाठी खेळपट्‌टया चांगल्याच हव्यात. त्या फ्लॅट आइण मृत असतील, तर कसोटी क्रिकेटपुढील आव्हाने अधिक कठिण होतील. 
-सचिन तेंडुलकर 

सचिन म्हणाला 
-कसोटी अजिंक्‍यपद ही क्रिकेटमधील आणखी एक केवळ स्पर्धा 
-यामुळे क्रिकेटमध्ये रस निर्माण होणार नाही. क्रिकेटमध्ये रस निर्माण करण्यासाठी प्रयत्न हवेत 
-कसोटी क्रिकेटमध्ये संयम महत्त्वाचा 
-शारीरिक आणि मानसिक संतुलन कुठल्याही खेळात महत्वाचे 
-यामध्ये समतोल साधला की आपल्याला हवे तसे परिणाम मिळतात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin tendulkar wishes for good pitches in test cricket