सचिनच्या हस्ते सिंधूला देणार बीएमडब्लू कार

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 ऑगस्ट 2016

हैदराबाद - रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते बीएमडब्लू कार देण्यात येणार आहे.

सचिन तेंडुलकरचा मित्र आणि हैदराबाद बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष व्ही. चामुंडेश्वरनाथ यांच्यातर्फे सिंधूला ही कार भेट देण्यात येणार आहे. पण, चामुंडेश्वरनाथ सिंधूला ही कार सचिनच्या हस्ते भेट देण्याचे ठरविले आहे. सिंधूला कार भेट देण्याचा कार्यक्रम 27 ऑगस्टला होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाचे ठिकाण अद्याप ठरलेले नाही.

सचिनच्या हस्ते यापूर्वी लंडन ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक मिळविणाऱ्या साईना नेहवालला बीएमडब्लू कार भेट देण्यात आली होती. तसेच 19 वर्षांखालील युवा आशियाई स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद मिळविणाऱ्या सिंधूला 2012 मध्ये मारुती कार देण्यात आली होती.

Web Title: Sachin will give BMW to Sindhu