‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धेत भारत ‘ब’ गटात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

नवी दिल्ली - या वर्षी होणाऱ्या बाराव्या ‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धेसाठी सात वेळच्या विजेत्या भारताचा मालदीव आणि श्रीलंकेसह ‘ब’ गटात समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेचा ‘ड्रॉ’ बुधवारी काढण्यात आला. 

ही स्पर्धा या वर्षी ४ ते १५ सप्टेंबरदरम्यान बांगलादेश येथे होणार आहे. तिसऱ्यांदा बांगलादेशाला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. भारताने यापूर्वी नेपाळमध्ये १९९७ आणि ढाक्‍यात २००९ मध्ये झालेल्या स्पर्धेत मालदीवचा अंतिम फेरीत पराभव केला होता. मालदीवने मात्र २००८ मध्ये भारतावर मात केली होती. 

भारत या स्पर्धेत गतविजेते असून, त्यांनी २०१५च्या स्पर्धेत घरच्या मैदानावर अफगाणिस्तानचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. अफगाणिस्तान संघ आता मध्य आशियाई फुटबॉल संघटनेशी जोडला गेल्यामुळे या वर्षी ‘सॅफ’ स्पर्धेत खेळणार नाही. 

घरच्या मैदानावर दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी बांगलादेश या वेळी उत्सुक असेल. त्यानी २००३ मध्ये त्यांनी मालदीवचा पेनल्टीमध्ये पराभव करून एकमात्र विजेतेपद मिळविले आहे. अफगाणिस्तान नसल्यामुळे या वेळी सात देश या स्पर्धेत सहभागी होतील.

अशी होईल स्पर्धा
अ - भारत, मालदीव, श्रीलंका
ब - बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, भूतान
सर्व सामने बंगबंधू स्टेडियमवर
अव्वल चार संघ उपांत्य फेरीत 
भारत सात वेळा विजेते, तर तीन वेळा उपविजेते

Web Title: SAF football tournament India will be in B group