साईप्रणित, वर्माची विजयी सुरवात

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 मे 2018

पहिल्या फेरीच्या लढतीत साईप्रणितने इस्रायलच्या मिशा झिल्बेर्मान याचा 21-17, 21-14 असा पराभव केला. समीरला मात्र, विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्याने न्यूझीलंडच्या अभिनव मानोटा याचे आव्हान 13-21, 21-17, 21-12 असे परतवून लावले. 

सिडनी -  प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत भारताच्या दुसऱ्या मानांकित बी. साईप्रणित आणि चौथ्या मानांकित समीर वर्मा यांनी बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सुरवात केली. 

पहिल्या फेरीच्या लढतीत साईप्रणितने इस्रायलच्या मिशा झिल्बेर्मान याचा 21-17, 21-14 असा पराभव केला. समीरला मात्र, विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्याने न्यूझीलंडच्या अभिनव मानोटा याचे आव्हान 13-21, 21-17, 21-12 असे परतवून लावले. 

या दोघांची आगेकूच सुरू असतानाच सौरभ वर्मा आणि अजय जयराम यांना पराभवाचा सामना करावा लागला. कडवा प्रतिकार केल्यानंतरही सौरभला जपानच्या टाकुमा उएडाविरुद्ध 21-19, 17-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. जयरामनेही पराभवापूर्वी जपानच्याच रिची टाकेशिटा याला झुंजवले. ताकेशिताने एक तास 12 मिनिटांच्या प्रदीर्घ लढतीत 20-22, 22-20, 21-17 असा विजय मिळविला. 
साईप्रणित दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या पंजी अहमद मैलाना, तर समीर जपानच्या ताकुमा याच्याशी खेळणार आहे. 

अन्य भारतीय निकाल 
पुरुष एकेरी - आयुमी मिने (जपान) वि. वि. साई उत्तेजिता राव चुक्का 21-8, 21-19, सोनी द्वि कुनकोरो (इंडोनेशिया) वि. वि. करण राजन राजाराजन 21-15, 21-8, पंजी अहमद मैलाना (इंडोनेशिया) वि. वि. राहुल यादव चित्तबोईना 21-11, 21-17, ली चेऊक यियू (चीन) वि. वि. लक्ष्य सेन 22-20, 13-21, 21-19, दुहेरी ः एम. आर. अर्जुन-रामचंद्रन श्‍लोक वि. वि. रेमंड ताम-एरिक वुओंग (ऑस्ट्रेलिया) 21-7, 21-15, टॅंग जीए चेन-गोह सून हुआत (मलेशिया) वि. वि. रोहन कपूर-शिवम शर्मा 21-15, 15-21, 21-7, 
महिला एकेरी - युलिया योसेफिन सुसांतो (इंडोनेशिया) वि. वि. एस.के. प्रिया कुड्रावेली 21-18, 22-20, वैष्णवी रेड्डी जक्का वि. वि. जॉर्जिना ब्लांड (इंग्लंड) 19-21, 21-15, 21-15, दुहेरी - मेघना जक्काम्पुडी-पूर्विशा एस. राम वि. वि. मॅगी शॅन-जोड्डी वेगा (ऑस्ट्रेलिया) 21-10, 21-16 
 

Web Title: Sai Pranit and Vermas winning start in australian badminton