श्रीकांत, सिंधू, प्रणयचा विजय सईद मोदी बॅडमिंटन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

लखनौ - गतविजेत्या के. श्रीकांतसह एच. एस. प्रणॉय, सौरभ वर्मा, समीर वर्मा आणि बी. साई प्रणित यांनी पुरुष, तर ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू यांनी बुधवारपासून सुरू झालेल्या सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.

तिसऱ्या मानांकित के. श्रीकांत याने आपली तंदुरुस्ती सिद्ध करताना मलेशियाच्या झुल्हेमी झल्कफी याचा 15-21, 21-7, 21-14 असा पराभव केला. गेल्यावर्षी स्विस ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या एच. एस. प्रणॉयने एन. व्ही. एस. विजेता याचा 21-11, 21-9, नवव्या मानांकित बी. साईप्रणितने आदित्य जोशीचा 21-14, 21-9 असा पराभव केला.

महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूने आपल्याच देशाच्या अरुण प्रभुदेसाईचा 21-9, 21-11 असा पराभव केला. याच विभागात पोलंड ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या रितुपर्ण दास हिने नेपाळच्या नान्गसल तमांग हिचे आव्हान 21-5, 21-6 असे संपुष्टात आणले. तिची गाठ रशियाच्या सेनिआ पोलिकार्पोवा हिच्याशी पडेल. तिने भारताच्या रिया पिल्लेचा 21-12, 21-11 असा पराभव केला. स्पेनच्या बार्टिझ कोरालेस, इंडोनेशियाच्या हन्ना रामदिनी यांनीदेखील दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

पुरुष दुहेरीत भारताच्या मनु अत्री-बी. सुमीत रेड्डी यांनी विजयी सलामी दिली. महिला विभागातून एन. सिक्की रेड्डी-अश्‍विनी पोनप्पा, अपर्णा बालान-प्राजक्ता सावंत यांनी आगेकूच सुरू केली.

Web Title: said modi international badminton competition