साईनाची शर्थीची झुंज अपयशी

ओडेन्स (डेन्मार्क) - डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत रविवारी शटल परतविताना भारताची साईना नेहवाल.
ओडेन्स (डेन्मार्क) - डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत रविवारी शटल परतविताना भारताची साईना नेहवाल.

मुंबई - पहिल्या डेन्मार्क ओपन बॅडमिंटन विजेतेपदाच्या सहाव्या वाढदिवशी पुन्हा तीच कामगिरी करण्यास साईना नेहवालला अपयश आले. तिने रविवारी अंतिम फेरीत तई त्झु यिंग हिला कडवी झुंज दिली. गेल्या काही महिन्यांतील सर्वोत्तम खेळ केला, तरीही तिला अंतिम सामन्यात १३-२१, २१-१३, ६-२१अशी हार पत्करावी लागली.

तईला साईड लाइनच्या पट्ट्यात फसवावे लागते आणि हे सोपे नसते. तईकडे फटक्‍यांची विविधता आहे; तसेच मनगटाच्या वेगाने हालचाली करीत शटलची दिशा ऐनवेळी बदलण्याची तिची खासियत आहे. याच आघाडीवर तिने साईनाला कोंडीत पकडले. 

तईने आता कोर्टला समांतर तसेच वेगाने खोलवर जाणारे फटके परतवण्याचाही चांगला सराव केला आहे. त्यामुळे तईने वर्चस्व घेतल्यावर ते भेदणे सोपे नसते. हेच पहिल्या आणि तिसऱ्या गेममध्ये घडले. तईविरुद्ध काही तरी वेगळे करण्याच्या दडपणाखाली साईनाकडून अपेक्षित नसलेल्या चुका झाल्या. तिची सर्व्हिसच बेसलाईनच्या बाहेर गेली. तसेच कमरेच्या वरून केल्यामुळे अवैध ठरली त्याचबरोबर तईच्या सर्व्हिसचा अंदाज अनेकदा चुकला. दुसऱ्या गेममध्ये साईनाने तईला बेसलाइनजवळ ठेवत तिला चुका करण्यास भाग पाडले; मात्र या गेममध्ये प्रत्येक गुण जिंकल्यावर व्यक्त होणारा आनंद तिच्या चाहत्यांच्या मनात धोक्‍याची घंटा वाजवत होता. निर्णायक गेममध्ये तईच्या चुका कमी होत असताना साईनाच्या वाढत गेल्या आणि तईने वर्षातील आठवे विजेतेपद जिंकले.

साईनाचे हुकलेले यश
 साईना २०१२ नंतर प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत, त्या वेळी विजेती.
 साईनाचा तईविरुद्धचा सलग ११ वा पराभव, तर एकंदरीत तेरावा.
 साईनाने यंदा तईविरुद्ध प्रथमच गेम जिंकला, यापूर्वीच्या चार लढतींत दोन गेममध्येच हार.
 यंदा इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत तईचा साईनाविरुद्ध विजय.
 २०१६ च्या ऑस्ट्रेलियन ओपननंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधील यश साईनास दुरावतच आहे.
 साईनाने या स्पर्धेत अकेन यामागुची, तसेच नोझोमी ओकुहाराविरुद्धची पराभवाची मालिका खंडित केली होती, 
 तईचा यंदाच्या ५६ पैकी केवळ ५ लढतीत पराभव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com