आता साईना, प्रणॉयची ऑस्ट्रेलियावर फुली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

सिडनी - भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात प्रकाशझोतातील कसोटी खेळण्यास नकार दिल्यानंतर प्रमुख बॅडमिंटनपटूंनी ऑस्ट्रेलियातील स्पर्धेकडे पाठ फिरविली आहे. साईना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय यांनी हा निर्णय घेतला. त्यांना अग्रमानांकन होते, पण या स्पर्धेने सुपर सिरीज प्रीमियर दर्जा गमावला, तसेच बक्षीस रक्कमही कमी झाली.

मंगळवारपासून स्पर्धा सुरू होत आहे. सोमवारी अद्यावत ड्रॉ जाहीर झाला तेव्हा या दोघांसह पी. कश्‍यप याचेही नाव नसल्याचे स्पष्ट झाले. त्याला सहावे मानांकन होते. पुरुष एकेरीत आता द्वितीय मानांकित बी. साईप्रणित आणि चौथा मानांकित समीर वर्मा हेच दोन भारतीय आहेत.

दृष्टिक्षेपात
 ही स्पर्धा आधीच्या वर्गवारीनुसार सुपर सीरिज प्रीमियर
 स्पर्धेची बक्षीस रक्कम सात लाख ५० हजार डॉलर्स
 जागतिक बॅडमिंटन महासंघाने जाहीर केलेल्या नव्या वर्गवारीनुसार वर्ल्ड टूर सुपर ३०० हाच दर्जा
 बक्षीस रकमेत कपात
 आता केवळ एक लाख ५० हजार डॉलर्स

Web Title: Saina Nehwal H. S. Pranoy Badminton Competition