साईनाला मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद

वृत्तसंस्था
रविवार, 22 जानेवारी 2017

साईना दुखापतीनंतर पुनरागमन करीत आहे. त्यामुळे तिच्यासाठी हे विजेतेपद महत्त्वाचे आहे. साईनाने यापूर्वी जून 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळविले होते.

सिबू (मलेशिया) - गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर भारताची बॅडमिंटनपटू साईना नेहवालला प्रथमच मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविण्यात यश आले आहे.

आज (रविवार) झालेल्या अंतिम फेरीतच्या सामन्यात साईनाने 46 मिनिटे चाललेल्या सामन्यात थायलंडच्या पोर्नपावी चोचूवोंगचा 22-10, 22-10 असा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. अग्रमानांकित साईनाने पहिल्या गेममध्ये 4-0 आघाडी घेतली होती. पण, 19 वर्षीय चोचूवोंगने कडवी लढत दिली. अखेर साईनाने 22-20 असा पहिला गेम जिंकण्यात यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या गेममध्येही तुल्यबळ लढत पहायला मिळाली. साईनाने हाँगकाँगच्या यिप पुई यिन हिचा उपांत्य फेरीत 21-13, 21-10 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती. 

साईना दुखापतीनंतर पुनरागमन करीत आहे. त्यामुळे तिच्यासाठी हे विजेतेपद महत्त्वाचे आहे. साईनाने यापूर्वी जून 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळविले होते.

Web Title: Saina Nehwal Lifts Malaysia Masters Grand Prix Gold Title