साईना इतकी स्पेशल नाही - सिंधू

वृत्तसंस्था
शनिवार, 1 एप्रिल 2017

दोन गेमची लढत; निकाल बदलला 
साईना आणि सिंधू यांच्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील ही केवळ दुसरीच लढत होती. या दोघींतील यापूर्वीची लढत 2014 मध्ये झाली होती. त्या वेळी साईनाने 21-14, 21-17 असा विजय संपादला होता. या वेळीही निर्णय दोन गेममध्येच झाला; मात्र विजय सिंधूचा झाला.

साईना ही काही स्पेशल नाही की तिला दर वेळी हरवावे. ती अन्य खेळाडूंसारखीच आहे. प्रत्येकीविरुद्ध सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करते आणि हेच तिच्याविरुद्धही करते, अशी प्रतिक्रिया इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत साईनाचा पराभव केल्यानंतर सिंधूने दिली.

साईनाने बॅडमिंटनचे धडे पुल्लेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले. तिने आता गोपीचंद यांना सोडले आहे; तर गोपीचंद हे सिंधूचे सुरुवातीपासूनचे मार्गदर्शक आहेत.

साईनाविरुद्धच्या लढतीत मागे पडल्यानंतरही दडपण नव्हते. माझा माझ्या खेळावर, क्षमतेवर विश्वास आहे. तिसऱ्या गेमचा विचारही माझ्या मनात येत नव्हता. प्रत्येक गुण जिंकण्यासाठी लढण्याचे ठरवले होते आणि त्यात यशस्वी झाले, असे सिंधूने सांगितले. 

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेस साईना आलीच नाही. सिंधूसाठी ही स्पेशल मॅच होती, असे विचारल्यावर तिने ही नेहमीसारखी एक लढत होती, यावरच भर दिला. ती काही स्पेशल नाही की तिच्याविरुद्ध जिंकावेच. मी जशा नेहमीच्या मॅच खेळते, तशीच ही मॅच होती. आमची मॅच असली की मी जिंकावेच, असे नव्हते. मी प्रत्येक लढतीत सर्वतोपरी प्रयत्न करते आणि हेच या लढतीतही केले, असे सिंधू म्हणाली. 

दोन गेमची लढत; निकाल बदलला 
साईना आणि सिंधू यांच्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील ही केवळ दुसरीच लढत होती. या दोघींतील यापूर्वीची लढत 2014 मध्ये झाली होती. त्या वेळी साईनाने 21-14, 21-17 असा विजय संपादला होता. या वेळीही निर्णय दोन गेममध्येच झाला; मात्र विजय सिंधूचा झाला.

Web Title: Saina Nehwal is not a special player that I have to beat every time: PV Sindhu