सायना-सिंधू यांच्यातील 'रुसवा-फुगवा' कायम!

सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.
Saina Nehwal And PV Sindhu
Saina Nehwal And PV Sindhu E sakal

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास रचला. सुवर्ण पदकाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्या तरी सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची कमाई करुन ती मायदेशी परतणार आहे. भारताच्या खात्यात दुसरे पदक जमा करणाऱ्या सिंधूवर अक्षरश: शुभेच्छांची बरसात होताना दिसतेय. देशात पीव्ही सिंधूच्या विजयाचा जल्लोष सुरु असताना एक व्यक्ती मात्र या आनंदी वातावरणापासून सोशल डिस्टन्सिंगच अंतर पाळावे तसे दूर असल्याचे दिसते. ते नाव दुसरं तिसरं कोणाचं नसून ते आहे ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणाऱ्या सायना नेहवालचं.

हो.. सोशल मीडियावर सक्रीय असणारी आणि भारतीय महिला हॉकी संघाच्या कामगिरीवर मनापासून आनंद व्यक्त करणाऱ्या सायना नेहवालने सिंधूला शुभेच्छा दिल्याचे सोशल मीडियावर तरी दिसत नाही. त्यामुळे सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. सोमवारी भारतीय बॅडमिंटन मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी सिंधूला शुभेच्छा दिल्या. पण अनुभवी आणि वरिष्ठ बॅडमिंटन स्टार सायनाने मात्र आपला वसा जपणाऱ्या सिंधूच्या कामगिरीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.

Saina Nehwal And PV Sindhu
एकेरीतील ऐतिहासिक प्रवास एकटीचा नाही; सिंधूनं खास शब्दांत मानले आभार

पीव्ही सिंधूने कांस्य पदक मिळवल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी तिला पुलेला गोपीचंद आणि सायनाने शुभेच्छा दिल्या का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सिंधून गोपीचंद सरांनी अभिनंदन केल्याचे सांगितले. पण सायनाकडून कोणताही संदेश मिळाला नसल्याचे ती म्हणाली. सोशल मीडियावरी शुभेच्छा अजून पाहिल्या नसल्याचा उल्लेखही सिंधूने केला होता. सायनासोबत अधिक बोलण होत नाही, असेही सिंधू म्हणाली.

Saina Nehwal And PV Sindhu
प्रॅक्टिसवेळी टीम इंडियाचा ओपनर जखमी, पहिल्या मॅचला मुकणार

शुभेच्छांच्या आड सायना आणि सिंधूमधील वाद

ऑलिम्पिकपूर्वी पुलेला गोपीचंद आणि पीव्ही सिंधू यांच्यात वाद असल्याची चर्चा रंगली होती. पण सिंधू आणि गोपीचंद यांच्या विधानावरुन या चर्चा फोल ठरल्या होत्या. दोघांनी एकमेकांविषयी मत व्यक्त करताना सावध पवित्रा घेतला होता. दुसरीकडे सायना आणि सिंधू यांच्यातील वाद चांगलाच जुना आहे. 2017 मध्ये सायना आणि सिंधू यांच्यातील वाद चर्चेत आला होता. खुद्द सायनाने या वृत्ताला दुजोराही दिला होता. सायना नेहवाल गोपीचंद अकादमी सोडून बंगळुरुमध्ये विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळुरुच्या प्रकाश पदुकोण अकादमीत सरावासाठी गेली होती. ती पुन्हा गोपीचंद अकादमीत परतल्यानंतर सिंधू-सायना वादविवादाचे किस्से रंगले होते. यात गोपीचंद यांचेही होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com