'फुलराणी' सायनावर पहिल्यांदाच आली अशी वेळ!

सायना नेहवालचा पती आणि बॅडमिंटन स्टार पारुपल्ली कश्यपन दिली माहिती.
Saina Nehwal
Saina NehwalSakal

जागतिक क्रमवारीत टॉपर राहिलेली सायना नेहवाल सध्या संघर्षाचा सामना करत आहे. दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या सायना नेहवालने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेतून माघार घेतली आहे. कारकिर्दीत पहिल्यांदाच ती या स्पर्धेला मुकणार आहे. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्य पदकाची कमाई करुन देणाऱ्या फुलराणीने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले आहे. याशिवाय यास्पर्धेत तिने आठ वेळा क्वार्टर फायनलपर्यंत मजलही मारली आहे.स्नायू दुखापतीसह ती सध्या गुडघ्याच्या दुखापतीचा सामना करत आहे. 12 ते19 डिसेंबर दरम्यान वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा स्पेनमध्ये रंगणार आहे.

सायनाचा पती आणि तिचा सहकारी पारूपल्ली कश्यपने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 'सायनाला नाइलाजास्तवर वर्ल्ड बॅडमिंटन स्पर्धतून माघार घ्यावी लागली आहे. ती सध्या दुखापतग्रस्त असून स्पर्धेपर्यंत ती फिट होणे अशक्य आहे. त्यामुळेच तिने स्पर्धेतून माघार घेतली आहे, असे पारुपल्ली कश्यपने स्पष्ट केले आहे.

Saina Nehwal
PKL Season 8 : प्रो कबड्डीचा मुहूर्त ठरला; पण...

आक्टोबरमध्ये डेन्मार्कमधील थॉमस कप आणि उबेर कप स्पर्धेतून सायनाला माघार घ्यावी लागली होती. याशिवाय फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीतील दुसऱ्या गेममध्ये तिच्यावर मैदान सोडण्याची वेळ आली. कश्यपने म्हणाला की, उबेर कप दरम्यान सायनाला मांडीच्या स्नायूची दुखापत झाली होती. डेन्मार्कमध्ये झालेल्या दुखापतीमधून ती सावरलेली नाही. फ्रेंच ओपनमध्ये ही दुखापत आणखी बळावली. त्यामुळे वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये ती कोर्टवर उतरणार नाही. डिसेंबरच्या अखेरीपर्यंत ती यातून सावरुन पुन्हा खेळताना दिसेल, असा विश्वासही कश्यपने व्यक्त केला आहे.

Saina Nehwal
टेस्टमध्ये रविंद्र जाडेजा बेस्ट; रोहित-विराटमध्ये स्पर्धा

मागील दोन वर्षांपासून सायना नेहवाल दुखापतीचा सामना करत आहे. ती टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीलाही मुकली होती. दुखापतीमुळे स्पर्धेतेला मुकावे लागत असल्यामुळे तिच्या रँकिंगवरही परिणाम होताना दिसतोय. सध्याच्या घडीला ती 23 व्या स्थानावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com