साईना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत 

पीटीआय
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

मकाव - भारताची स्टार बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिने मकाव ग्रांप्री स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र या वेळीही तिला प्रतिस्पर्धीचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला. पुरुष एकेरीत पी. कश्‍यप आणि दुहेरीत मनू अत्री-बी. सुमीथ रेड्डी यांचे आव्हान मात्र आटोपले. 

साईनाला सलग दुसऱ्या लढतीत तीन गेमपर्यंत लढावे लागले. अव्वल मानांकन असणाऱ्या साईनाने गुरुवारी दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या दिनार द्याह आयुस्टिन हिचे आव्हान 17-21, 21-18, 21-12 असे परतवून लावले. साईनाची गाठ आता चीनच्या झॅंग यीमान हिच्याशी पडणार आहे. 

दरम्यान, पी. कश्‍यप आणि मनू अत्री-बी सुमीथ रेड्डी यांना पराभवाचा सामना करावा लागला. कश्‍यपने तैवानच्या लीन यू सिएन याला झुंजवले, तरी तो विजयापासून दूरच राहिला. कश्‍यपला 13-21, 20-22 असा पराभव पत्करावा लागला. 

दुहेरीत तिसरे मानांकन असलेल्या अत्री-रेड्डी जोडीचाही प्रतिकार तोकडा पडला. त्यांना सिंगापूरच्या डॅनी बावा ख्रिस्नान्टा-हेंड्रा वियाया जोडीकडून 20-22, 19-21 असा पराभव पत्करावा लागला. 

महिला एकेरीच्या लढतीत साईनाचा विजय झाला असला, तरी तिच्या हालचाली मंदावल्याचे जाणवत आहे. पहिली गेम तिने 11-7 अशा आघाडीनंतर गमावली. दुसऱ्या गेममध्ये मात्र साईनाने कडक खेळ केला. गुणांची झटपट वसुली करत तिने 11-3 अशी मोठी आघाडी मिळविली. मात्र, गेमच्या दुसऱ्या टप्प्यात साईनाच्या हालचाली पुन्हा मंदावल्या आणि आयुस्टिनने हिने पिछाडी भरून काढत 18-18 अशी बरोबरी साधली. साईनाने या वेळी सलग तीन गुण घेत दुसरी गेम जिंकली. तिसऱ्या निर्णायक गेमला आयुस्टिन हिने सुरवातीला 4-2 अशी छोटी आघाडी मिळविली. साईनाने पाचव्याच गुणाला (5-5) बरोबरी साधल्यावर गेमच्या मध्यात 11-5 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दोन वेळा सलग चार गुणांची कमाई करत साईनाने विजयावर शिक्कामोर्तब केले.

Web Title: Saina Nehwal in quarters