सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

साईना नेहवालचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
बर्मिंगहॅम (इंग्लंड) - भारताची ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली. सिंधूने गुरुवारी दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या दिनार याह आयुस्टिने हिचे आव्हान 21-12, 21-4 असे तीस मिनिटांत संपुष्टात आणताना महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

साईना नेहवालचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
बर्मिंगहॅम (इंग्लंड) - भारताची ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली. सिंधूने गुरुवारी दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या दिनार याह आयुस्टिने हिचे आव्हान 21-12, 21-4 असे तीस मिनिटांत संपुष्टात आणताना महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेत सहावे मानांकन असणाऱ्या सिंधूचा दुसऱ्या फेरीतील विजय अधिक सफाईदार होता. दुबळ्या प्रतिस्पर्धीचा तिने अचूक फायदा उठवत तिला निष्प्रभ केले. पहिल्या गेममध्ये 2-2, 3-3, 4-4 अशा बरोबरीच्या सुरवातीनंतर सिंधूने एकदा सलग तीन आणि दुसऱ्यांदा सलग पाच गुणांची कमाई करत 12-5 अशी मोठी आघाडी मिळवली आणि नंतर मागे वळून बघितले नाही. पहिल्या गेममध्ये आयुस्टिने 12 गुणांपर्यंत पोचली. दुसऱ्या गेममध्ये तिला केवळ चारच गुण कमावता आले. दुसऱ्या गेमला सिंधूने 9-0 अशी जबरदस्त सुरवात केली. आयुस्टिने हिने नंतर तीन गुण मिळवत 9-3 अशी पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. अर्थात, त्यानंतर तिला केवळ एकच गुण मिळवता आला. सिंधूने 9-3 अशा स्थितीत सलग नऊ गुणांची नोंद करत 18-3 अशी विजयी आघाडी घेत आयुस्टिने हिला निष्प्रभ केले.

स्पर्धेत आठवे मानांकन असलेल्या साईनाने जपानच्या माजी विजेत्या नोझोमी ओकुहारा हिचे आव्हान 21-15, 21-14 से संपुष्टात आणले. प्रदीर्घ कालावधीनंतर कोर्टवर उतरलेल्या ओकुहारा हिचा पराभव करण्यास साईनाला फारसे कष्ट पडले नाहीत. साईनाने तिच्याविरुद्धच्या सातव्या लढतीत सहाव्यांदा विजय नोंदवून आपले वर्चस्व सिद्ध केले.

अन्य भारतीय निकाल -
पुरुष - के. श्रीकांत पराभूत वि. झाओ जुनपेंग 19-21, 21-19, 12-21, अजय जयराम पराभूत वि. हुआंग युझिआंग 21-21, 13-21
मिश्र दुहेरी - प्रणव चोप्रा-एन. सिक्की रेड्डी पराभूत वि. यू येऑन सोंग-किम हा ना 19-21, 20-22

Web Title: saina nehwal select in second round