खेळताना अजूनही ताण येतो - साईना

पीटीआय
मंगळवार, 28 मार्च 2017

नवी दिल्ली - टणक कोर्टवर खेळताना गुडघा अजूनही दुखतो; त्यामुळे पुन्हा दुखापत होण्याची भीती सतत मनात असते, अशी खंत फुलराणी साईना नेहवालने व्यक्त केली.

नवी दिल्ली - टणक कोर्टवर खेळताना गुडघा अजूनही दुखतो; त्यामुळे पुन्हा दुखापत होण्याची भीती सतत मनात असते, अशी खंत फुलराणी साईना नेहवालने व्यक्त केली.

गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्ती आणि फॉर्म या दोन्ही आघाड्यांवर लढावे लागणाऱ्या साईनाने जानेवारीत मलेशिया मास्टर्स स्पर्धेत विजेतेपद मिळवून अपेक्षा उंचावल्या आहेत. नेमकी शस्त्रक्रिया काय झाली हे मला वैद्यकीय भाषेत सांगता येणार नाही, पण या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा कोर्टवर परतणे किती कठीण आहे हे मी जाणू शकते. गमावलेली लय पुन्हा मिळवणे आणि पुन्हा अव्वल दर्जाची तंदुरुस्ती मिळवणे फारच कठीण असते, असे मत साईनाने इंडियन ओपन स्पर्धेस सामोरे जाण्यापूर्वी व्यक्त केले.

Web Title: Saina Nehwal statement