पुनरागमनानंतर साईना प्रथमच उपांत्य फेरीत

पीटीआय
शनिवार, 21 जानेवारी 2017

सॅरावाक - साईना नेहवालने सलग तिसरी लढत दोन गेममध्ये जिंकत मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुनरागमनानंतर साईनाने प्रथमच उपांत्य फेरी गाठली आहे. साईनाने आठव्या मानांकित फित्रियानी हिचा २१-१५, २१-१५ असा पाडाव केला. या विजयामुळे साईनाने फित्रियानीविरुद्धची सलग तिसरी लढत जिंकली. अग्रमानांकित साईनाची आज हाँगकाँगच्या यिप पुई यिन हिच्याविरुद्ध लढत होईल. तिच्याविरुद्ध साईनाने आठपैकी सहा लढती जिंकल्या आहेत. 

साईना सोडल्यास भारतीयांची पीछेहाटच झाली. मुंबईचा अजय जयराम इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका गिनतिंग याच्याविरुद्धची अपयशी मालिका खंडित करू शकला नाही. सहाव्या मानांकित अजयला २८ मिनिटांत १३-२१, ८-२१ अशी एकतर्फी हार पत्करावी लागली. अजयचा अँथनीविरुद्धचा हा सलग तिसरा पराभव आहे.

साईनाला सूर काहीसा उशिरा गवसला. ती ०-४ मागे पडली होती. त्यानंतर ती ६-११ अशी ब्रेकच्या वेळी मागे पडली होती; मात्र त्यानंतर तिचा खेळ बहरला. तिने १२-१२ बरोबरीनंतर १६-१४ आघाडी घेतली. त्यानंतर सलग पाच गुण जिंकत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये तिने ४-२, ९-५, ११-६ अशी सुरवात केली होती; पण तिची आघाडी १३-१२ कमी झाली. त्यानंतर साईनाने आक्रमण करीत गेम, तसेच लढत जिंकली.

Web Title: Saina semi-finals for the first time