आव्हान निर्माण करण्यातही सिंधू, साईनास अपयश

सिंधू, साईना नेहवाल प्रतिस्पर्ध्यांसमोर फारशा आव्हानही निर्माण करु शकल्या नाहीत
सिंधू, साईना नेहवाल प्रतिस्पर्ध्यांसमोर फारशा आव्हानही निर्माण करु शकल्या नाहीत

मुंबई : जगज्जेती पी. व्ही. सिंधू तसेच माजी जागतिक अव्वल मानांकित साईना नेहवालला ताकदवान प्रतिस्पर्ध्यांसमोर पुरेसे आव्हान निर्माण करणेही जमले नाही. त्यांना क्वालालंपूरला सुरू असलेल्या या स्पर्धेत मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतच हार पत्करावी लागली.

गतवर्षीच्या ऑगस्टनंतरचा सिंधूचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विजेतेपदाचा दुष्काळ संपण्यास तयार नाही. तिला तई झु यिंगसमोर माफक आव्हानच निर्माण करता आले. सिंधू या सामन्यात 16-21, 16-21 अशी पराजित झाली, तर कॅरोलिन मरिनने साईनास सध्या तिच्यापेक्षा सरस असलेल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवणे अवघड आहे हे दाखवले. साईना उपांत्यपूर्व फेरीच्या एकतर्फी लढतीत 8-21, 7-21 अशी पराजित झाली.

सिंधूने तईविरुद्धच्या यापूर्वी 16 पैकी पाच लढती जिंकल्या आहेत. सिंधूने चांगली आक्रमक सुरुवात केली होती. तिने 3-6 पिछाडीवरून दोनदा एका गुणाची आघाडी घेतली होती, पण कोर्ट फास्ट होते आणि ते तिच्या पथ्यावर पडत होते. त्यातच तईच्या फसव्या रॅलीज सिंधूची डोकेदुखी वाढवत होत्या. त्यानंतरही सिंधूने तईला मोठ्या आघाडीपासून रोखले होते. पण अखेरचे सातपैकी सहा गुण जिंकत तईने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये तईने 11-4 आघाडी घेतली, एवढेच नव्हे तर तिच्याकडे नऊ मॅच पॉईंट होते. त्याचवेळी सिंधू त्वेषात आली. तिने तईला काही चुका करण्यास भाग पाडले, पण अखेर 36 मिनिटांची ही लढत तईने जिंकली.

मरिनच्या आक्रमणासमोर साईनाचे काहीही चालले नाही. दुखापतीमुळे मरिनला दीर्घ ब्रेक घ्यावा लागला होता. ती अजूनही पूर्ण बहरात नाही. त्यामुळे साईनाला संधी असेल असे वाटत होते, पण मरिनने दीर्घ रॅलीज तसेच अचूक ड्रॉप्स आणि स्मॅशच्या जोरावर हुकूमत राखली. साईनाचा बचाव भक्कम होत आहे असे वाटू लागले की मरिन नेटजवळ वेगाने येत काही क्षण अगोदर शटल ताकदीने परतवत होती. तिचे डिसेप्टीव फ्लीक्‍सही प्रभावी होते.

दोन्ही गेममध्ये सुरुवातीस साईनाने माफक आव्हान निर्माण केले, पण त्यावेळी मरिनही पूर्ण स्थिरावली नव्हती. मरिनने पहिल्या गेममध्ये ब्रेकनंतर दोन गुण गमावले होते, तर दुसऱ्या गेममध्ये अवघा एकच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com