सुपरस्टार आज फुटबॉलच्या मैदानात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

पुणे - अभिषेक बच्चन यांच्या नेतृत्वाखालील सुपरस्टार्स इलेव्हन आणि पुण्याच्या खेळाडूंचा ‘व्हीटीपी इलेव्हन’ यांच्यातला ‘सकाळ सुपरस्टार कप फुटबॉल’ सामना शनिवारी (ता. २) सायंकाळी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगणार आहे.

अभिषेक बच्चन यांच्याबरोबर रणबीर कपूर, दिनो मारिओ, शब्बीर अहलुवालिया, करण वाही आणि टेनिसपटू लिएन्डर पेस या सामन्यात खेळणार आहेत. या सामन्यातून उभा राहणारा निधी विविध सामाजिक कामांकरिता देण्यात येणार आहे.

सायंकाळी ६.३० वाजता उद्‌घाटन सोहळा होणार आहे. क्रीडांगण आच्छादीत असल्याने  पाऊस असला तरी सामना वेळेत सुरू होईल.

जीएस स्पोर्टसच्या सहकार्याने ‘सकाळ’ने हा सामना आयोजित केला असून, ‘व्हीटीपी इलेव्हन’ हा संघ ‘व्हीटीपी रिॲलिटी’ यांनी प्रायोजित केला आहे. 

पॉवर्ड बाय फिनोलेक्‍स पाइप्स आणि को-असोसिएटेड विथ टॅब कॅपिटल लि. (ऑनलाइन एसएमई फायनान्स), को-पॉवर्ड बाय क्वेस्ट टुर्स असलेल्या या स्पर्धेसाठी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हे बॅंकिंग पार्टनर, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌स हे एज्युकेशनल पार्टनर, आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट हे वेल्थ  पार्टनर आहेत.

सकाळ सुपरस्टार कप फुटबॉल स्पर्धा
  कधी - शनिवार, ता. २
  कोठे - श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे
  वेळ - सायंकाळी ६.३० वा. दर्शकांना दुपारी ४ वाजल्यापासून प्रवेश 

हे लक्षात ठेवा 
 खाण्याचे पदार्थ आणू नयेत 
 वाहनतळाची सुविधा मोफत
 प्रवेशिका उपलब्ध नाहीत
 क्रीडांगण आच्छादीत असल्याने पाऊस असला तरी सामना वेळेत सुरू होईल
 सामन्याचे थेट प्रक्षेपण सायंकाळी ६.३० पासून ‘साम’ वाहिनीवर 

Web Title: Sakal Superstar Cup Football match today