"सकाळ सुपरस्टार कप'मध्ये दोन जूनला रंगणार सामना 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

सकाळ सुपरस्टार कप 
कधी - दोन जून 
कुठे - श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे 
वेळ - सायंकाळी साडेसहा वाजता 

पुणे - बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, दिनो मोरिओ, शब्बीर अहलुवालिया, करण वाही आणि पुण्यातील फुटबॉलपटूंमध्ये येत्या दोन जूनला बालेवाडीच्या स्टेडिअमवर अनोखा फुटबॉल सामना रंगणार आहे. सामाजिक कार्यासाठी निधी उभारणे, हा या प्रदर्शनीय सामन्याचा प्रमुख उद्देश आहे. 

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा "द बॅंग टूर' पाठोपाठ रंगलेला रॉकिंग "सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018' कॉन्सर्ट... अशा बहारदार कार्यक्रमांनंतर आता "सकाळ माध्यम समूह' घेऊन येत आहे "सकाळ सुपरस्टार कप.' यात "ऑल स्टार्स फुटबॉल क्‍लब' ही सेलिब्रिटींची टीम आणि पुण्याचा "व्हीटीपी इलेव्हन' संघ यांच्यात रंगणारा अनोखा सामना फुटबॉलप्रेमींना पाहण्याची संधी मिळणार आहे. यात 18 खेळाडू खेळणार असून, उरलेल्या सेलिब्रिटींची नावे टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. 

आपल्या वेगळ्या धाटणीच्या इव्हेंट्‌समधून "सकाळ'ने नेहमीच काही तरी हटके करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे "जीएस स्पोटर्स'च्या सहकार्याने "सकाळ'ने हा सामना आयोजित केला आहे. "सकाळ'च्या या उपक्रमातील "व्हीटीपी इलेव्हन' या फुटबॉलपटूंच्या टीमला तयार करण्यासाठी "व्हीटीपी रिऍलिटी'ने प्रायोजकत्व दिले आहे. पॉवर्ड बाय "फिनोलेक्‍स पाइप्स' आणि को-पॉवर्ड बाय "क्वेस्ट टुर्स' या सुपरस्टार कपमध्ये बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींबरोबर व्यावसायिक फुटबॉलपटूंचा रंगतदार सामना होईल. यातून बॉलिवूड स्टार्सचे फुटबॉल कौशल्य अनुभवता येणार आहे. 

लहान मुले आणि तरुणाईची फुटबॉल क्रेझ लक्षात घेऊन "सकाळ'ने हा उपक्रम आयोजित केला आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या उपक्रमाचे बॅंकिंग पार्टनर आहेत. 

प्रवेशिका 25 मेनंतर 
"सकाळ सुपरस्टार कप'च्या मोफत प्रवेशिका 25 मेनंतर उपलब्ध असतील. त्याची माहिती आणि तपशील दररोज "सकाळ'मध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. 

सकाळ सुपरस्टार कप 
कधी - दोन जून 
कुठे - श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे 
वेळ - सायंकाळी साडेसहा वाजता 

Web Title: #SakalSuperstarCup bollywood superstars football match in Pune