सालाह "प्रीमियर'मध्ये सर्वोत्तम

वृत्तसंस्था
सोमवार, 14 मे 2018

इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये लिव्हरपूलकडून खेळताना पहिल्याच मोसमात मोहंमद सालाह याने आपली छाप पाडली आहे. सालाहची या वर्षीच्या इंग्लिश प्रीमियर लीगमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

लंडन - इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये लिव्हरपूलकडून खेळताना पहिल्याच मोसमात मोहंमद सालाह याने आपली छाप पाडली आहे. सालाहची या वर्षीच्या इंग्लिश प्रीमियर लीगमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

सालाहवर यावर्षी पुरस्कारांचा पाऊस पडत आहे. यापूर्वी "पीएफए', फुटबॉल विश्‍लेषक संघटना यांनी त्याला वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविले आहे. त्याचबरोबर "लिव्हरपूल' संघानेही त्याचा आपला या वर्षीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरवले आहे. 
 

Web Title: salah top in premier league