सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची प्रतीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

सांगली - डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलने 2007 आणि 2008 मध्ये सलग दोनवेळा जिल्ह्याला गदा आणली. त्यानंतर त्याची हॅटट्रिक चुकली. तरीही हार न मानता चंद्रहारने गेल्या दोन वर्षापर्यंत प्रयत्न केले. 2008 नंतर गेली दहा वर्षे जिल्ह्याला पुन्हा महाराष्ट्र केसरीची गदा आणता आली नाही.

यंदा पुन्हा कुस्ती शौकीनांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दुष्काळी जत तालुक्‍यातील कंठी येथील संदीप मोटे माती विभागात तर कचरेवाडीचा मल्ल प्रशांत सुर्यवंशी गादी विभागातून महाराष्ट्र केसरीसाठी झुंझणार आहेत. 

जिल्ह्याची कुस्ती परंपरा शतकाहून अधिक काळाची आहे. संस्थानकाळापासून ते आजपर्यंत कुस्तीचा इतिहास आणि महान कुस्तीगीर अनेकांना माहित आहेत. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत तसेच देशाबाहेरही इथल्या महान मल्लांनी कुस्तीची पताका फडकवली. त्यामुळे काही वर्षापूर्वीपर्यंत सांगलीला कुस्ती पंढरी देखील संबोधले जात होते. कुस्ती खेळणारे अनेक मल्ल गावच्या जत्रेपासून ते हिंदकेसरीची गदा आणण्याचे स्वप्न पाहतात. अलिकडच्या काळात राष्ट्रकुल, आशियाई आणि ऑलिम्पिकमध्ये पदक आणण्याचेही ध्येय उराशी बाळगून मल्ल धडपडत असतात. 

राज्यातील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आतापर्यंत जिल्ह्याला केवळ सातवेळा गदा मिळाली. 2008 मध्ये चंद्रहार पाटीलने जिल्ह्याला गदा मिळवून आणली. त्यानंतर त्याची हॅटट्रिक चुकली. बरेच मल्ल महाराष्ट्र केसरीची गदा मिळाल्यानंतर पुन्हा कुस्ती सोडून देतात. परंतू चंद्रहारने "हार' न मानता दोन वर्षापूर्वीपर्यंत जिद्दीने प्रयत्न केले. परंतू दुर्दैवाने तिसऱ्यांदा गदा आणण्याचे स्वप्न भंगले. चंद्रहारच्या बरोबर गेल्या दहा वर्षात इतर अनेक मल्लांनी प्रयत्न केले. परंतू गदा आणता आली नाही. यंदा संदीप मोटे आणि संभाजी हे दोन मल्ल निवडीमध्ये प्रथमच उतरले आणि त्यांची निवड झाली. त्यांच्याकडून गदा आणण्याची आशा व्यक्त होत आहे. 

जिल्ह्यातील महाराष्ट्र केसरी- 
पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारी होत. त्यानंतर भगवान मोरे यांनी गदा पटकावली. गणपतराव खेडकर डबल महाराष्ट्र केसरी ठरले. आप्पासाहेब कदम यांनीही मान मिळवला. त्यानंतर 2007 व 2008 मध्ये चंद्रहारने गदा आणली. 

यंदाचे दावेदार- 
माती विभागातून संदीप मोटे महाराष्ट्र केसरीसाठी झुंझणार आहे. तो आमदार संभाजी पवार व वस्ताद किशोर अवघडे यांचा पट्टा आहे. तर गादी विभागातील प्रशांत सुर्यवंशी हा खवसपूरचे वस्ताद भारत भोसले यांचा पट्टा आहे. 

..तर यश मिळेल- 
कुस्ती हा खेळ प्रचंड कष्ट आणि मेहनतीचा आहे. केवळ ताकद असून उपयोग नसते. तंत्रशुद्ध सराव, शारिरीक, बौद्धिक आणि मानसिक तयारी देखील महत्वाची आहे. तसेच खुराकासाठी आर्थिक मदतही आवश्‍यक असते. या सर्वांचा मेळ घालणे आवश्‍यक आहे. तरच या क्षेत्रात यश मिळू शकते. 
- उत्तमराव पाटील
(आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक) 

Web Title: Sangli district is waiting for Maharashtra Kesari