सानिया मिर्झाला "टॉप्स'मधून वगळले 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 मे 2018

सानिया मिर्झाला ऑलिंपिक पदक लक्ष्य योजनेतून (टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम-टॉप्स) वगळण्यात आले आहे. तिच्यासह पाच कुस्तीगीर आणि दोन बॉक्‍सरनाही डच्चू देण्यात आला आहे. सानिया सध्या गरोदरपणामुळे टेनिसपासून दूर आहे. त्यामुळे तिला साह्य मिळणार नाही हे अपेक्षितच होते.

नवी दिल्ली - सानिया मिर्झाला ऑलिंपिक पदक लक्ष्य योजनेतून (टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम-टॉप्स) वगळण्यात आले आहे. तिच्यासह पाच कुस्तीगीर आणि दोन बॉक्‍सरनाही डच्चू देण्यात आला आहे. सानिया सध्या गरोदरपणामुळे टेनिसपासून दूर आहे. त्यामुळे तिला साह्य मिळणार नाही हे अपेक्षितच होते.

दरम्यान, ए. धारुन आणि मोहन कुमार यांचा टॉप्समध्ये समावेश करण्यात आला आहे. आता या योजनेअंतर्गत 192 क्रीडापटूंना साह्य दिले जात आहे. प्रवीण राणा, सत्यव्रत काडियन, सुमित, ललिता आणि सरिता या कुस्तीगीरांबरोबरच एल. देवेंद्रो सिंग आणि एस. सरजूबाला देवी या बॉक्‍सरना वगळण्यात आले आहे. सध्या या योजनेत 35 ऍथलिटस्‌, 31 नेमबाज, 26 पॅरा स्पोर्टस्‌, 21 बॉक्‍सर, 15 तिरंदाज आणि 10 बॅडमिंटनपटूंना साह्य लाभत आहे. 

Web Title: Sania Mirza dropped out of "Tops"