World Cup 2019 : मी पाक संघाची आई नाही : सानिया मिर्झा

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जून 2019

सानियाने शोएब मलिक आणि पाकिस्तानच्या संघातील इतर खेळडूंसह 'शिशा प्लेस'ला हजेरी लावल्याने दोघींतील या वादाला सुरवात झाली. ''साईना मला तुझ्या मुलाची काळजी वाटते. तु त्याला हुक्का पार्लरला घेऊन गेलीस, हे त्याच्या तब्येतीसाठी हानिकारक नाही का?'' ​

वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : पाकिस्तानचा संघाला भारताविरुद्ध झालेल्या पराभवामुळे चाहत्यांचा चांगलाच रोष सहन करावा लागत आहे. अशातच संघाच्या पराभवामुळे पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्यात ट्विटरवर शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. 

कोण आहे ही वीणा मलिक?

Veena Malik

सानियाने शोएब मलिक आणि पाकिस्तानच्या संघातील इतर खेळडूंसह 'शिशा प्लेस'ला हजेरी लावल्याने दोघींतील या वादाला सुरवात झाली. ''सानिया मला तुझ्या मुलाची काळजी वाटते. तु त्याला हुक्का पार्लरला घेऊन गेलीस, हे त्याच्या तब्येतीसाठी हानिकारक नाही का?'' ​

सानियाने एका व्हायरल झालेल्या व्हिडिओला उत्तर दिले होते. त्या पोस्टवर वीणाने सानियाला बडबड करणारे हे ट्विट केले होते. सानियाने पहिल्या ट्विटमध्ये तिच्या खाजगी आयुष्यामध्ये इतरांनी केलेल्या हस्तक्षेपाबद्दल जोरदार टीका केली होती. या ट्विटमध्ये ती म्हणाली होती, ''मूर्ख माणसांनो, संघ पराभूत झाला तरी त्याला जेवण करण्याची परवानगी असते.''  

वीणाने केलेल्या टीकेवरही तिने सडेतोड उत्तर दिले आहे. ती म्हणाली, ''वीणा मी माझ्या मुलाला शिशा प्लेसला नेले नव्हते आणि असही तु किंवा इतर कोणीही माझ्या मुलाची काळजी करण्याची गरज नाही ते करण्यास मी सर्मथ आहे. तसेच मी पाकिस्तानच्या संघाची डाईटिशियनही नाही किंवा आईही नाही.'' 

पाकिस्तानचा संघ भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी रात्री उशीरापर्यंत शिशा प्लेसमध्ये असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. याबाबत पाकिस्तानचा फलंदाज शोएब मलिक यानेही स्पष्टीकरण दिले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sania Mirza slams fans and Veena Malik for accusing her