INDvWI : जखमी शिखर धवनच्या जागी टीम इंडियात 'या' खेळाडूची वर्णी

टीम ई-सकाळ
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

मुश्‍तीक अली टी-20 स्पर्धेत महाराष्ट्राविरुद्ध दिल्लीकडून खेळताना धवनला ही दुखापत झाली. त्याला दुखापतीमधून पूर्ण बाहेर पडण्यासाठी त्याला काही काळ द्यावा लागेल.

नवी दिल्ली : डिसेंबरमध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या मोहिमेला सुरवात करणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत.

lay.google.com/store/apps/developer?id=Sakal+Media+Pvt+Ltd&hl=en">'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मात्र, ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला चांगलाच झटका बसला आहे. डावखुरा सलामीवीर फलंदाज शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने टीम इंडियासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

धवन गुडघ्याच्या दुखापतीमुळे विंडीजविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही. त्याच्याजागी युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला पसंती देण्यात आली आहे. वेस्ट इंडियविरुद्ध पहिला टी-20 सामना 6 डिसेंबरला होणार असून सॅमसन या सामन्यात खेळणार आहे. 

- आशिया मॅरेथॉनमध्ये दीपक बंडबेला कास्य

दरम्यान, मुश्‍तीक अली टी-20 स्पर्धेत महाराष्ट्राविरुद्ध दिल्लीकडून खेळताना धवनला ही दुखापत झाली. त्याला दुखापतीमधून पूर्ण बाहेर पडण्यासाठी त्याला काही काळ द्यावा लागेल, असे मत 'बीसीसीआय'च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यामुळे निवड समितीने तातडीने त्याला विश्रांती देण्याची निर्णय घेतला आणि त्याच्याजागी संजू सॅमसनची निवड केली.

- हरभजन सिंग म्हणाला, 'दादा, आता यांची बदली कर'

धवनच्या जागी वर्णी लागलेल्या सॅमसनला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठीही निवडण्यात आले होते. मात्र, त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली नाही. 

- INDvBAN : 'दादा'चं कौतुक पडलं विराटला भारी; काय आहे नेमकं प्रकरण!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanju Samson replaces injured Shikhar Dhawan against West Indies series