पंत सावध रहा; धोनीचा खरा वारसदार बांगलादेशविरुद्ध करणार एण्ट्री

वृत्तसंस्था
Friday, 18 October 2019

- ट्वेंटी20 मालिकेसाठी नवे प्रयोग केले जाणार
- बांगलादेशविरुद्ध रिषभ पंतऐवजी दुसऱ्या कोणालातरी संधी मिळू शकते
- संजू सॅमसन, शिवम दुबे यांना संधी मिळण्याची शक्यता 

नवी दिल्ली : भारताची निवड समिती नोव्हेंबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी20 मालिकेत नवनवे प्रयोग करणार यात काहीच शंका नाही. ट्वेंटी20 विश्वकरंडकाला केवळ एक वर्ष उरल्याने निवड समिती संघबांधणीचा विचार करु लागली आहे. 

उपलब्ध असला तरी आता त्याला संघात स्थान नाहीच; निवड समितीचा कठोर निर्णय 

मागील दोन वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या ट्वेंटी20 मालिकेत संघात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होता. आता बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेतही नव्या खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईचा स्टार खेळाडू शिवम दुबे यालाही आतंराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते. 

Sanju Samson

संजूच्या नावाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. एकदिवसीय आणि ट्वेंटी क्रिकेटमध्ये रिषभ पंतला येणार अपयश पाहता अनेकांनी संजूला संधा देण्यात यावी अशी मागणी केली होती. संजू सध्या चांगल्या फॉर्मात आहे. नुकतेच त्याने विजय हजारे करंडकात गोव्याविरुद्ध झालेल्या सामन्यात द्विशतकही झळकाविले आहे. 

INDvsSA : गोलंदाज चालेनात, फलंदाज टिकेनात; आफ्रिकेसमोर फक्त अंधार

भारतीय संघात आता रिषभच्या जागी नव्या पर्यायांची चाचपडताळणी केली जात आहे. त्यासाठी संजूला मिळू शकते. संजूला 2014मध्ये इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघात सर्वप्रथम संधी मिळाली होती मात्र, त्याला अंतिम संघात जागा मिळाली नाही. त्यानंतर त्याने झिंबाब्वेविरुद्ध पदार्पण केले मात्र, त्यानंतर तो एकही सामना खेळलेला नाही. भारत अ संघात मात्र त्याला नेहमी संधी मिळाली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanju Samson Set To Be Selected For Bangladesh Series